शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी पोटच्या चिमुकलीचा खून, नराधम बापाला अटक

मुंबई तक

• 09:11 AM • 27 Jul 2026

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका नराधम बापानेच आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा गळा आवळून खून केला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी पोटच्या चिमुकलीचा खून

point

नराधम बापाला अटक

Crime News : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये नात्यांना काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. आपल्या विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी एका नराधम बापानेच आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना घडवून आणल्यानंतर आरोपी बापाने "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली" अशी कबुली दिली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाचा शनिवारी (25 जुलै) पोलिसांनी अत्यंत खळबळजनक खुलासा करत आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

थेट बापावर संशय

कमालगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुगौरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील रहिवासी बबलू याची दीड वर्षाची मुलगी जिज्ञासा हिचा अचानक मृत्यू झाला होता. मुलीची आई खुशबू हिने जुन्या वैमनस्यातून गावातीलच सुरेंद्र, मंशाराम आणि अंकित यांच्यावर विटा-दगड मारल्याचा व मुलीला उपचारासाठी नेऊ न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. मात्र, शवविच्छेदन (पोस्टमाॉर्टम) अहवालात चिमुकलीचा मृत्यू दगड लागल्याने नाही, तर गळा आवळल्याने झाल्याचे उघडकीस आले, ज्यामुळे पोलिसांचा संशय थेट मुलीच्या बापावर गेला.

हे ही वाचा : नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, अहिल्यानगरातील घटना; सर्वत्र हळहळ

उपचारासाठी घेतले कर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयावरून आरोपी पिता बबलू याची कसून चौकशी करण्यात आली असता तो पोलिसांसमोर पार तुटला आणि त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याची मुलगी सतत आजारी असायची आणि तिच्या उपचारासाठी त्याने खूप कर्ज घेतले होते. 20 जून रोजी तो घरी आला असता, शेजाऱ्यांनी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केल्याचे समजले. यावरून शेजाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि खोट्या प्रकरणात फसवण्यासाठी त्याने स्वतःच्याच आजारी मुलीचा गळा आवळून खून केला आणि शेजाऱ्यांच्या दगडफेकीत ती मारली गेल्याचा बनाव रचला.

हे ही वाचा : भावासोबत जाण्यापासून वडिलांनी रोखलं, 10 वर्षीय लेकाकडून 45 वर्षीय वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

गळा आवळून खून

पोलिस कोठडीत असलेला आरोपी बबलू आता आपल्या कृत्यावर पश्चाताप व्यक्त करत आहे. पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या पत्नीकडे चौकशी सुरू केली, तेव्हा दगडफेक झालीच नव्हती हे सत्य बाहेर येईल या भीतीने तो हादरला होता. डॉक्टरांच्या चर्चेवरून मुलीचा मृत्यू गळा दाबल्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाल्यावर, त्याने आपल्या भावाच्या मदतीने डॉक्टर आणि पोलिसांवरच आरोप करत बचावाचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर पोलिसांच्या तपासापुढे त्याचा खोटा बनाव टिकू शकला नाही आणि निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी नराधम बापाची रवानगी तुरुंगात झाली.