धाकटी जाऊ संतापली, थोरल्या जावेचे दाताने थेट कानच तोडले, नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 08:33 AM • 27 Jul 2026

मध्यप्रदेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील भांडणावेळी धाकटी जाऊ चिडली. तिने आपल्या थोरल्या जावेसोबत असं कृत्य केलं की सगळे अवाक झाले. ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

धाकटी जाऊ संतापली

point

थोरल्या जावेचे दाताने थेट कानच तोडले

point

नेमकं कारण काय?

Crime News : कराराची शेती आणि 1000 रुपयांच्या व्यवहारावरून दोन जावांमध्ये झालेला कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन अत्यंत हिंसक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. या वादादरम्यान धाकटी जाऊ संतापली. या संतापाच्या भरात तिने आपल्या थोरल्या जावेचा कान दातांनी तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात कानाला गंभीर इजा झाल्याने जखमी महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

'असा' सुरु झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय पीडित महिला रवीना कासदे हिने सांगितले की, कुटुंबात सुमारे एक एकर शेताच्या करारावरुन वाद सुरू होता. तिने शेतीच्या मशागतीसाठी तिने स्वत:चे 1000 रुपये लावले होते. शेतीचे काम सुरू करताना तिने लावलेले पैसे परत मागितले असता दोन्ही बाजूंच्या महिलांमध्ये बाचाबाची सुरू झाली. रवीना जेव्हा घरात जाऊ लागली, तेव्हा तिच्या जावेने तिला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी तिच्या कानाला दातांनी जोरात चावा घेतला.

हे ही वाचा : सासूला घरात एकटं पाहिलं अन् चाकूने केले सपासप वार, सून का झाली क्रूर?

प्लास्टिक सर्जरी करावी लागणार

या हल्ल्यात कानाचा मोठा भाग गंभीररीत्या तुटला असून, त्याला मोठी दुखापत झाली आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने रवीनाला शासकीय रुग्णालय इटारसी येथे उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांच्या मते कानाला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असून, भविष्यात त्यावर रिकन्स्ट्रक्शन (प्लास्टिक सर्जरी/पुनर्रचना) करावी लागण्याची शक्यता आहे. पीडितेने सांगितले की, तिचा पती मजुरी करतो आणि त्यांना दोन लहान मुले आहेत. वाद वाढत असताना तिने सरपंचांना बोलावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेळीच मदत न मिळाल्याने हा प्रकार घडला.

हे ही वाचा : भावासोबत जाण्यापासून वडिलांनी रोखलं, 10 वर्षीय लेकाकडून 45 वर्षीय वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

कान तोडण्याचा अजब प्रकार

घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या वैद्यकीय अहवाल आणि दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे; तपासाअंती नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने दुसऱ्या महिलेचा कान चावल्याच्या या अजब आणि धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या मोठी चर्चा रंगली आहे.