भावासोबत जाण्यापासून वडिलांनी रोखलं, 10 वर्षीय लेकाकडून 45 वर्षीय वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

मुंबई तक

26 Jul 2026 (अपडेटेड: 26 Jul 2026, 04:04 PM)

Crime News : एका 10 वर्षीय मुलाने आपल्या 45 वर्षीय वडिलांवर तब्बल 8 ते 10 वेळा कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या घटनेनं परिसर हादरून गेला. संबंधित प्रकरणात बाप-लेकांत झालेल्या वादाचं कारण आणि एकूण प्रकरण समजून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाप लेकाच्यात शिवीगाळ 

point

लेकाकडून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला 

Crime News : उत्तर प्रदेशातील गोंडा देहात कोतवाली परिसरातील बेसिया चेनग्राम पंचायत स्थित भट्ठा गावात रविवारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला. एका 10 वर्षीय मुलाने आपल्या 45 वर्षीय वडील बिशन लाल चौहान यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत तब्बल 8 ते 10 वेळा सपासप वार केले होते. ग्रामस्थांनी लाल चौहान यांना गोंडा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची परिस्थिती अगदीच बिघडून गेली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

बाप लेकाच्यात शिवीगाळ 

बिशन लाल आपल्या मोठ्या मुलाला मजुरीसाठी बाहेर पाठवत होते. तेव्हा दहा वर्षीय मुलगा देवराजला त्याच्या घरी पाठवण्यास नकार दिला होता. याच प्रकरणाला उद्देशून वडील आणि मुलाच्यात वाद निर्माण झाला होता. नंतर वाद इतका वाढत गेला की, दोघांमध्ये शिवीगाळ करण्यात आली होती. 

लेकाकडून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला 

सांगण्यात येतंय की, विवादादरम्यान रागाच्याभरात देवराज घरात आला आणि त्याने कुऱ्हाडीने वडिलांवर हल्ला केला. त्याने वडिलांवर कुऱ्हाडीने तब्बल 8 ते 10 हल्ले केले होते. या हल्ल्यात बिशन लाल हे खाली कोसळले. त्यानंतर तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. 

हे ही वाचा : "खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार

या घटनेची माहिती मिळताच, देहात कोतवाली पोलिसांनी घटनास्थळा दाखल होत तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी देवराज हा घटनास्थळावरून फरार झाला होता. आरोपीच्या तपासासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले.