नवरा बाथरुममध्ये गेला, बायको माहेरच्यांना घेऊन आली अन् घडलं भयानक

मुंबई तक

• 08:11 AM • 27 Jul 2026

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. तिसऱ्या पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळले आहे. यामागे नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा बाथरुममध्ये गेला

point

बायको माहेरच्यांना घेऊन आली अन् घडलं भयानक

Crime News : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. हृदेश तिवारी असं 56 वर्षीय मृत पतीचं नाव आहे. ज्या पत्नीने तिवारी यांना जाळलं ती त्यांची तिसरी पत्नी होती.  त्यांची तिसरी पत्नी रानू आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

दोघांचंही तिसरं लग्न

मृतक हृदेश तिवारी यांची मुलगी सोनम हिने यासंबंधी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर या भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. सोनमच्या माहितीनुसार, तिच्या सख्ख्या आईचे 2023 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये तिचे वडील हृदेश यांनी रानू नावाच्या महिलेशी नोंदणीकृत (कोर्ट) विवाह केला होता. रानूचेही हे तिसरे लग्न होते; तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता, तर दुसरा पती तिला सोडून गेला होता.

हे ही वाचा : राजीनामा होताच दीपकेंच्या वडिलांना अश्रू अनावर, प्रधान यांचं नाव घेत थेट...

मालमत्तेसाठी दबाव

लग्नानंतर लगेचच रानूने हृदेश यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती आणि ती सतत पैसे व मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती. रानूच्या या त्रासाला आणि दबावाला कंटाळून हृदेश तिवारी तिला जागेचा प्लॉट देण्यास तयार झाले होते. गुरुवारी (23 जुलै) या प्लॉटची खरेदी-विक्रीची नोंदणी (रजिस्ट्री) होणार होती आणि नेमक्या याच दिवशी ही क्रूर घटना घडवण्यात आली. 

हे ही वाचा : 'युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय', प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं ट्विट

बाथरुममध्ये गेले असता आग लावली

दुपारी हृदेश हे बाथरूममध्ये गेले असताना, सावत्र आई रानू आणि तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावली. शेजाऱ्यांनी हृदेश यांना जळताना पाहिल्यानंतर, आरोपी रानूने स्वतःचा बचाव करण्यासाठी आग विझवण्याचे नाटक केले; यात तीही किरकोळ भाजली असून सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोतवाली प्रभारी चंद्रकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सोनमच्या अर्जावरून आरोपी सावत्र आई रानूविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि जखमी आरोपी महिलेला पोलीस कोठडीत उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.