नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, अहिल्यानगरातील घटना; सर्वत्र हळहळ

मुंबई तक

26 Jul 2026 (अपडेटेड: 26 Jul 2026, 03:35 PM)

neet aspirant suicide case : नीट परीक्षेत 166 गुण मिळाल्यानंतर तणावात असलेल्या अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

neet aspirant suicide case

neet aspirant suicide case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

point

अहिल्यानगरातील घटना; सर्वत्र हळहळ

neet aspirant suicide case : नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील सीजेपीचे आंदोलन संपुष्टात आले. मात्र त्याचदरम्यान नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Gen Z आंदोलन: ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाईंनी सांगितल्या 'त्या' 5 मोठ्या गोष्टी, ज्यांनी बदलली देशाच्या राजकारणाची दिशा!

नीट परीक्षेत 166 गुण मिळाले अन् अंकिता नैराश्यात गेली 

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे राहणारी अंकिता सांगळे ही नीट परीक्षेची विद्यार्थिनी होती. तिला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले होते. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. शनिवारी दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसल्याची संधी साधून अंकिताने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा : "खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार

जंतर-मंतरवरील आंदोलन संपुष्टात

विशेष म्हणजे, ज्या दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती आणि जंतर-मंतरवरील आंदोलन संपुष्टात आले, त्याच काळात अंकिताने आपले जीवन संपवले. नीट परीक्षेतील कमी गुणांमुळे ती प्रचंड तणावाखाली होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबाव आणि मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या प्रकरणी कर्जत पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. अंकिताच्या मृत्यूमागील सर्व परिस्थितीची चौकशी पोलीस करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिक तपास कर्जत पोलीस करत असून तपासानंतर पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.