MPSC पेपरफुटीचा काळा कारभार, 'ती' अॅकॅडमी अन् किती लाखांत सौदा? रोहित पवारांचा नवा बॉम्ब
MPSC Paper Leak Controversy : MPSC चे अनेक पेपर फुटल्याचे सनसनाटी आरोप आमदार रोहित पवार यांनी केले आहेत. ते नेमकं काय काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"MPSC पेपरफुटीचा काळा कारभार, किती लाखात सौदा?"
रोहित पवारांचा सरकारवर नवा बॉम्ब
MPSC Paper Leak Controversy : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विविध सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांवरून राज्य सरकार आणि MPSC आयोगावर काळा कारभार केल्याचे सनसनाटी आरोप केले आहेत. औषध निरीक्षक (FDA) परीक्षेचा 90 टक्के पेपर परीक्षेच्या दोन दिवस आधीच फुटल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी पुराव्यासह केला. या घोटाळ्याप्रकरणी तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट आणि सीबीआय (CBI) चौकशीची मागणी करत, येत्या दहा दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभरातील तरुणांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा : 'उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची, योगींसाठी कठीण काळ', नवनीत मनधानी काय म्हणाले?
महाराष्ट्रातील परीक्षांमधील 'काळ्या कारभारा'चा पाढा पवारांनी वाचला
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील परीक्षांमधील 'काळ्या कारभारा'चा पाढाच वाचला. नीट (NEET), एसआरपीएफ (SRPF), जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती आणि टीईटी (TET) अशा अनेक परीक्षांचे पेपर लिक झाल्याचे त्यांनी नमूद केले. गरिबांची मुले दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षा देतात; मात्र पैसे देऊन आणि विशिष्ट विचारसरणीची माणसे सिस्टीममध्ये बसवण्यासाठी हे जाळे विणले गेले असल्याचे ते म्हणाले. एफडीएच्या (FDA) औषध निरीक्षक पदाच्या 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, नंदुरबार येथील कौटिल्य अकॅडमीच्या माध्यमातून एमपीएससीचा पेपर सेट करणारा व्यक्तीच फुटला होता. 20 मार्च रोजी उमेदवारांच्या व्हॉट्सॲपवर 90 टक्के प्रश्न आले होते. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आणि व्हॉट्सॲपवर आलेल्या पीडीएफमधील प्रश्न, पर्याय आणि त्यांचा क्रम अगदी हुबेहूब जुळत असल्याचे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिले.
हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टी आता पंजाबमधील 'त्या' मुद्द्यावरही बोलणार, अभिजीत दिपकेंनी सगळं सांगितलं
