कराड: नीट परीक्षेत अपयश, विद्यार्थीनीनं उंदीर मारण्याच्या वड्या खाऊन संपवलं जीवन

मुंबई तक

28 Jul 2026 (अपडेटेड: 28 Jul 2026, 03:58 PM)

Satara News : नीट परीक्षेत अपयश मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या विद्यार्थिनीने विषाचे औषध पिऊन जीवन संपवलं. मृत विद्यार्थिनीची ओळख समोर आली आहे.

Satara News

Satara News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नीट परीक्षेत यश न आल्याने विषारी पदार्थाचं सेवन

point

विद्यार्थीनीचा दुर्दैवी अंत

Satara News : सकलेन मुलानी - नीट परीक्षेत अपयश मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या विद्यार्थिनीने विषाचे औषध पिऊन जीवन संपवलं. मृत विद्यार्थिनीची ओळख समीक्षा दीपक पवार (वय 18) अशी ओळख समोर आली. समीक्षाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तोवर तिचा मृत्यू झाला. ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे ठाणे परिसरात ता. 27 जुलै रोजी सोमवारी घडली आहे. या घटनेनं संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोचे अफेयर असल्याचा पतीला संशय, पंख्याला लटकवून मारलं

नीट परीक्षेत यश न आल्याने विषारी पदार्थाचं सेवन

समीक्षा पवारने मागील वर्षी नीट परीक्षेचा पेपर दिला होता. मात्र, परीक्षेत म्हणावं असं यश न आल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. दिलेल्या माहितीनुसार, तिने 23 जुलै रोजी उंदीर मारण्याच्या वड्या देखील खाल्ल्या होत्या, याबाबत तिने कुटुंबीयांना कसलीही माहिती कळू दिली नव्हती. 

विद्यार्थीनीचा दुर्दैवी अंत

दोन दिवसांनंतर विषाचा परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला होता. नंतर नातेवाईवाकांनी तात्काळपणे 26 जुलै रोजी पीडितेला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : Astrology : शनीची वक्री गती, 'या' राशीचं अवघड होणार

विद्यार्थिनीने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे शेरे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारी नोकरींसाठी किंवा स्पर्धा परीक्षांना आलेल्या अपयशाला अनेक लोक सामोरे जाऊ लागली आहेत. याबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.