नवरा अन् नव्या प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या, कसा रचला कट?

मुंबई तक

• 04:47 PM • 28 Jul 2026

एका महिलेने आपला नवरा आणि प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा अन् नव्या प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या

point

कसा रचला कट?

Crime News : प्रेमाच्या त्रिकोणातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अनेकदा पतीची किंवा प्रियकराची हत्या झाल्याच्या घटना समोर येतात. मात्र, उत्तर प्रदेशात एका महिलेने आपल्या पतीच्या आणि नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराचाच काटा काढल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमित नावाच्या तरुणाची त्याची माजी प्रेयसी कल्पना हिने पती संजू आणि नवीन प्रियकर लोकेश यांच्या साहाय्याने हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल एक दिवस घरातच लपवून ठेवण्यात आला होता आणि दुसऱ्या दिवशी पती व नवीन प्रियकराने तो माछुआ कालव्याच्या पुलाजवळ फेकून दिला.

हे वाचलं का?

गळा आवळून हत्या

2 मे रोजी हरदुवागंज येथील माछुआ कालव्याच्या पुलाजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या डोक्याच्या मागील भागावर गंभीर दुखापत करून आणि गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते आणि तीन महिने उलटूनही या प्रकरणात कोणताही सुगावा लागला नव्हता, ज्यामुळे या 'ब्लाइंड मर्डर'चा पर्दाफाश करणे पोलिसांसाठी अत्यंत कठीण बनले होते.

हे ही वाचा : 'Gen Z ला काय बोलायचं? आता बोलणंही अवघड झालंय.. केमिकल लोचा', IPS नांगरे-पाटील असं का म्हणाले?

हातावर कोरले होते प्रेयसीचे नाव

दरम्यान, 25 जुलै रोजी अमितचे काका अशोक कुमार आणि भाऊ वेद प्रकाश यांनी जवां पोलीस ठाण्यात अमित तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. अमितचे गेल्या 4-5 वर्षांपासून रामपुर येथील कल्पना नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तो तिच्याकडे गेला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या माहितीवरून पोलीस कल्पनाच्या घरी गेले असता तिथे कुलूप आढळले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना जुने फोटो व कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितले, ज्यावरून तो मृतदेह अमितचाच असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, अमितच्या हातावर प्रेयसीचे नाव कोरलेले असल्याने पोलिसांना संशय बळकट झाला आणि तपासाला गती मिळाली.

हे ही वाचा : कराड: नीट परीक्षेत अपयश, विद्यार्थीनीनं उंदीर मारण्याच्या वड्या खाऊन संपवलं जीवन

'अशी' अडकली जाळ्यात

पोलिसांनी शोध मोहीम राबवून रविवारी (26 जुलै) संशयित महिला कल्पना हिला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि अमितची हत्या तिचा पती संजू व बुलंदशहर येथील नवीन प्रियकर लोकेश यांनी मिळून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्परता दाखवत कल्पना आणि तिचा नवीन प्रियकर लोकेश या दोघांना अटक केली आहे. मात्र, हत्येतील सहभागी असलेला तिचा पती संजू सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.