पिंपरी: लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय, अभिनेत्रीसह तीन महिलांची पोलिसांनी केली सुटका

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसाय बंद पाडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अभिनेत्रीसह तीन महिलांची देव व्यापाराच्या दलदलीतून सुटका केली आहे. छत्तीसगड येथील अभिनेत्रीकडून पिंपरीत वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. ताथवडे येथील साई लॉजवर हा वेश्या व्यवसाय सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई करत दोन दलालांना अटक केली आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:43 AM • 26 Feb 2022

follow google news

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसाय बंद पाडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अभिनेत्रीसह तीन महिलांची देव व्यापाराच्या दलदलीतून सुटका केली आहे. छत्तीसगड येथील अभिनेत्रीकडून पिंपरीत वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.

हे वाचलं का?

ताथवडे येथील साई लॉजवर हा वेश्या व्यवसाय सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई करत दोन दलालांना अटक केली आहे.

अनैतिक संबंधामुळे महिलेने गमावला जीव, लॉजवर बोलवून प्रियकराने केली हत्या

छत्तीसगड येथील एका अभिनेत्रीवर पिंपरी-चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या ताथवडे येथील लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. या सापळ्यात आरोपी अडकल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका केली.

आरोपी हे What’s app कॉलच्या माध्यमातून मुलींना लॉजवर पाठवायचे. या मुलींच्या नावावर लॉजमध्ये खोली बुक केलेली असायची. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी, हेमंत प्रणाबंधू साहू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड

    follow whatsapp