Viral Video: BJP नेत्याकडून भर रस्त्यात आई आणि मुलाला चपलेने मारहाण

ग्रेटर नोएडामधील एका भाजप नेत्याने एका महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तरपणे.

Viral Video

Viral Video

मुंबई तक

01 Jul 2025 (अपडेटेड: 01 Jul 2025, 09:40 PM)

follow google news

नोएडा: ग्रेटर नोएडाजवळील दनकौर येथील बिलासपूर शहरात एका भाजप नेत्याने एका महिलेला आणि तिच्या मुलाला सार्वजनिक ठिकाणी चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी आरोपी नेत्याला अटक केली आहे. बिलासपूरमधील येथील रहिवासी अतिक अहमद हा भाजप अल्पसंख्याक मोर्च्याचा महामंत्री आहे.

हे वाचलं का?

कर्जाची रक्कम परत न केल्याबद्दल मारहाण

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला आणि तिचा मुलगा मूळचा आसामचा आहे. सध्या ते बिलासपूर शहरातील दनकौर येथील अतिक अहमदची जी जमीन आहे तेथील एका झोपडपट्टीत राहतात. आई आणि मुलगा दोघेही येथे कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात.

हे ही वाचा>> महिलेचे सुरू होते भलत्याच पुरूषासोबत अनैतिक संबंध, पती आणि दिराला समजलं अन्...

दरम्यान, भाजप नेता अतिक याचा व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय आहे. असे म्हटले जाते की, पीडित महिलेने त्याच्याकडून व्याजावर काही पैसे घेतले होते. पण महिलेने मुदतीत पैसे परत न केल्यावर, भाजप नेत्याला राग आला आणि त्याने आई आणि मुलाला सार्वजनिक ठिकाणी चपलेने मारहाण केली.

Video व्हायरल झाल्याने पोलिसांनी केली भाजप नेत्याला अटक

व्हायरल व्हिडिओमध्ये, काळा टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घातलेला अतिक अहमद हा महिलेला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ करताना आणि चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. आई आणि मुलाला चपलेने मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा>> मोठं कांड! बायको निघाली मास्टरमाईंड, प्रियकरासाठी केला पती आणि सासूचा खून, कारण ऐकून हादरून जाल?

पीडिताच्या बाजूने या घटनेबद्दल दनकौर कोतवाली पोलिसांकडे कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि प्रकरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, पोलिसांनी आरोपी नेत्याला अटक केली.

पोलिसांनी आरोपी अतिक अहमदविरुद्ध कलम 151 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेत्याला अटक केल्यानंतर, पीडित महिला आणि तिच्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ते त्यांच्या झोपडपट्टीत उपलब्ध नव्हते.

    follow whatsapp