भाजपला मोठा धक्का, डोंबिवलीतील दिग्गज नेता ठाकरेंच्या शिवसेनेत?

मिथिलेश गुप्ता

26 Jun 2025 (अपडेटेड: 26 Jun 2025, 09:12 PM)

भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते लवकरच ठाकरे गटात प्रवेश करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का

डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का

Google CTA

डोंबिवली: भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कारण डोंबिवलीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत.

हे वाचलं का?

डोंबिवलीतील भाजप नेते आणि नगरसेवकांच्या गटाला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आणि विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा>> 7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, हिंदी सक्ती होऊ देणार नाही... मराठीसाठी ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी त्यांनी एकदा राजीनामा दिला होता. मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावर पुनरागमन केले होते. तरीसुद्धा, आजूबाजूच्या वार्डांना भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिला.

हे ही वाचा>> हिंदी भाषा सक्ती: राज ठाकरेंची मोठी घोषणा, आषाढीच्या मुहूर्तावर मुंबईतून फुंकणार रणशिंग!

नेमकं काय म्हणाले विकास म्हात्रे? 

"सत्तेत असूनही निधी मिळत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे विकासकामे अडकली आहेत. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला," असे विकास म्हात्रे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी स्पष्ट केले की, सर्वच पक्षांशी चर्चा सुरू आहे, मात्र ठाकरे गटाकडून मानसन्मान मिळाल्यास आम्ही त्या पक्षात प्रवेश करू. असेही संकेत त्यांनी दिले आहेत.