हिंदी भाषा सक्ती: राज ठाकरेंची मोठी घोषणा, आषाढीच्या मुहूर्तावर मुंबईतून फुंकणार रणशिंग!

मुंबई तक

शालेय शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आता थेट मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पाहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंची मोठी घोषणा (फाइल फोटो, सौजन्य: Instagram)
राज ठाकरेंची मोठी घोषणा (फाइल फोटो, सौजन्य: Instagram)
social share
google news

मुंबई: हिंदी भाषा सक्तीविरोधात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाईल असा आदेश फडणवीस सरकारने जारी केला होता. त्याविरोधात राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच आवाज उठवला. आता याचबाबत राज ठाकरेंनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 

सरकार हिंदी भाषा सक्तीवरून माघार घेत नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी आता 6 जुलै 2025 (रविवार) मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असून यामध्ये कोणाचाही झेंडा नसेल असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 

'मला बघायचंय की, कोण-कोण मोर्च्यात सामील होतं', पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले?

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

हे ही वाचा>> 7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, हिंदी सक्ती होऊ देणार नाही... मराठीसाठी ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

याच भेटीनंतर राज ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'दादा भुसे यांच्याकडे काही गोष्टींची उत्तरं नव्हती. ते त्याच-त्याच गोष्टी बोलत होते. त्यामुळे माझी जी आधी भूमिका होती तीच आता देखील आहे. माझा या सगळ्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. हिंदी कोणत्या किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ देणार नाही. या गोष्टींसाठी मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की, येत्या 6 जुलैला (रविवार) गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतला आहे.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp