उल्हासनगरच्या CHM कॉलेजच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मिथिलेश गुप्ता

• 07:18 PM • 22 Nov 2026

Devendra Fadanvis : उल्हासनगरमधील नामांकित सीएचएम कॉलेजच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेजच्या संस्थेच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांमध्ये उभारण्यात आलेल्या शैक्षणिक जाळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

 उल्हासनगर शहराच्या विकासाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? 

point

महापौराना निमंत्रण नाही?

Devendra Fadanvis : उल्हासनगरमधील नामांकित सीएचएम कॉलेजच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेजच्या संस्थेच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांमध्ये उभारण्यात आलेल्या शैक्षणिक जाळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचे काम अशा संस्था करत असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश वधरियासह निरंजन हिरानंदानी उपस्थित होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका होणार! काय आहे 'पाताळ लोक' प्रकल्प?

 उल्हासनगर शहराच्या विकासाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? 

उल्हासनगर शहराच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उल्हासनगर हे विकसित होणारे शहर असून भविष्यात या शहराला मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून उल्हासनगरमध्ये स्थायिक झालेल्या सिंधी समाजाला मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उल्हासनगर हे डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींनी एकत्रितपणे उभे केलेले शहर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. सीएचएम कॉलेजच्या नव्या इमारतीकडे पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त होत असून, नव्या भारताची संकल्पना प्रत्यक्षात आकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्याच्या दिशेने पुढे नेणाऱ्या अशा संस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

महापौराना निमंत्रण नाही?

या कार्यक्रमात शहराचे प्रथम नागरिक महापौर अश्विनी निकम उपस्थित नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात महापौराचे पती कमलेश निकम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाचे कुठले प्रकारचे निमंत्रण आम्हाला नव्हते. आता महापौराना निमंत्रण न दिला गेल्याचे चर्चा शहरभारात रंगली आहे. याबाबत बोलताना कॉलेजचे मुख्याध्यापिका मंजु लालवाणी पाठक यांनी सांगितले की हा कॉलेजचे कार्यक्रम होता आम्ही कोणालाही निमंत्रित केलं नव्हतं भाजपचे सीएम असल्याने तेच त्यांची सर्व पदाधिकारी स्वतः आले होते.

हे ही वाचा : पैसा- पाणी : इन्फोसिसने 11 वर्षांपूर्वीची 'ती' संधी का गमावली? आज AI क्षेत्रात भारत कुठे असता?

 कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाच्या नियोजनात विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांनी नाव न लिहिण्याचे अटीवर सांगितले की, या कार्यक्रमात आवर्जून यायला सांगितला होता, विद्यार्थ्यांना भर उन्हात तासनतास बसावे लागल्याची चर्चा असून, कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी डोक्यावर रुमाल, दुपट्टे बांधून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा सहन होत नसल्याने काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळ सोडल्याचेही चित्र समोर आले आहे. यासंदर्भात कॉलेजची मुख्याध्यापिका मंजु लालवाणी पाठक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज ऊन जास्ती होता विद्यार्थ्यांचे हाल झाले हे मान्य आहे. एकीकडे महाविद्यालयाच्या नव्या वास्तूमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळणार असल्याचा दावा केला जात असताना, उद्घाटनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उन्हात बसण्याची वेळ आल्याने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.