आजपासून 'या' 7 मोठ्या गोष्टी बदलणार, तुमच्या-आमच्यावर होणार थेट परिणाम!

Rule change: 1 जुलै 2025 पासून काही मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणार आहे. जाणून घ्या हे नेमके कोणते बदल आहेत.

1 जुलै 2025 पासून होणार मोठे बदल

1 जुलै 2025 पासून होणार मोठे बदल

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 01 Jul 2025, 01:13 AM)

follow google news

Rule change from 1 July 2025: जुलै 2025 च्या सुरुवातीपासून भारतात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. या नियमांचा तुमच्या खिशावर, प्रवासावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. रेल्वे, बँकिंग, गॅस सिलिंडरपासून ते वाहनांपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात बदलाचा परिणाम दिसून येईल. हे 7 मोठे बदल काय आहेत ते जाणून घेऊया.

हे वाचलं का?

रेल्वे प्रवास महागणार

1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी आहे. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये भाडे वाढणार आहे. नॉन-एसीमध्ये प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 2 पैसे वाढणार आहे. 500 किमीपर्यंतच्या दुसऱ्या श्रेणीच्या प्रवासात कोणताही बदल नाही. त्याच वेळी, 500 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी अर्धे पैसे द्यावे लागतील.

हे ही वाचा>> Personal Finance: SIP मुळे व्हाल गर्भश्रीमंत, समजून घ्या सगळं गणित, अर्ध्या देशाला माहीत नाही हे Calculation

तात्काळ तिकिटासाठी आधार आवश्यक

तात्काळ तिकीट बुकिंग आता अधिक कठोर होईल. 1 जुलैपासून आयआरसीटीसीवर तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य असेल. फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आधार लिंक केल्याशिवाय तात्काळ तिकीट बुक केले जाणार नाही.

गॅस सिलेंडरच्या किमतीं कमी होणार?

दर महिन्याप्रमाणे 1 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल शक्य आहेत. अलीकडेच 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त झालेला. आता 14 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा>> सोनं घ्या सोनं! सलग 3 दिवस सोन्याचे भाव प्रचंड घसरले; तुमच्या शहरात 24 कॅरेट गोल्डची आजची किंमत काय?

पॅन कार्डसाठी आधार पडताळणी आवश्यक

आतापर्यंत पॅन कार्डसाठी जन्म प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही कागदपत्र पुरेसे होते. परंतु 1 जुलैपासून एक नवीन प्रणाली लागू केली जाईल ज्यामध्ये आधार पडताळणीशिवाय पॅन कार्ड मिळवणे शक्य होणार नाही. सीबीडीटीचा हा नियम प्रत्येक नवीन अर्जदारावर परिणाम करेल.

विमान प्रवासावरही परिणाम

1 जुलैपासून एअर टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किंमती बदलतील. तेल कंपन्या दरमहा या दरांचा आढावा घेतात. जूनमध्ये दिल्लीत एटीएफ 3954 रुपयांनी स्वस्त झालेला. किंमतीतील चढउतारांचा परिणाम विमान भाड्यावर दिसून येईल.

बँकिंगमध्ये नवीन शुल्क

ICICI बँक 1 जुलैपासून एटीएम आणि IMPS व्यवहारांवर नवीन शुल्क लागू करणार आहे. महानगरांमध्ये 5 आणि नॉन-मेट्रोमध्ये 3 मोफत पैसे काढल्यानंतर, 23 रुपये शुल्क भरावे लागेल. IMPS साठी 2.5 रुपये ते 15 रुपये आकारले जातील.

    follow whatsapp