सोनं घ्या सोनं! सलग 3 दिवस सोन्याचे भाव प्रचंड घसरले; तुमच्या शहरात 24 कॅरेट गोल्डची आजची किंमत काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 30 जून 2025 रोजीही सोन्या-चांदीच्या भावात उलथापालथ झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 30 जून 2025 रोजीही सोन्या-चांदीच्या भावात उलथापालथ झाल्याचं समोर आलं आहे. सकाळई 7:40 मिनिटांनी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचं इंडेक्स प्रति 10 ग्रॅम 95524 रुपयांवर होतं.
भारतीय बुलियन संघ (IBA) नुसार, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95790 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87808 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 106460 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97260 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89150 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97260 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89150 रुपये झाले आहेत.










