Personal Finance: RBI मुळे 50 लाखांच्या कर्जावर 'इतकी' होणार EMI ची बचत! प्रचंड Saving करा तात्काळ
Home loan emi saving: RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृहकर्जदारांना मोठा फायदा होणार आहे. जाणून घ्या ५० लाख कर्ज असणाऱ्यांची किती रुपयांची बचत होईल.
ADVERTISEMENT

Personal Finance tips for home loan emi saving: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्स (0.25%) कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कपातीमुळे गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Car Loan) आणि इतर कर्जांचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे.
आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचे मासिक हप्ते (EMI) कमी होतील. विशेषत: ज्यांचे गृहकर्ज फ्लोटिंग रेटवर (Floating Rate) आहे आणि ते एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेट (EBLR) किंवा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) शी जोडलेले आहे, त्यांना या कपातीचा थेट आणि त्वरित फायदा होईल.
रेपो रेट कपातीचा तुमच्या गृहकर्जाच्या EMI वर कसा परिणाम होईल?
रेपो रेट कमी झाल्यावर बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात निधी मिळतो. हा फायदा बँकांनी ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात कपात करून देणे अपेक्षित आहे.










