Personal Finance: SIP मुळे व्हाल गर्भश्रीमंत, समजून घ्या सगळं गणित, अर्ध्या देशाला माहीत नाही हे Calculation

रोहित गोळे

SIP Calculation: एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा भविष्यातील आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कालांतराने ही रक्कम कोटींमध्ये बदलू शकते. तर त्याचं नेमकं कॅल्क्युलेशन समजून घ्या.

ADVERTISEMENT

Personal Finance: SIP Investment
Personal Finance: SIP Investment
social share
google news

Personal Finance Tips for SIP Calculation: सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या छोट्या बचतीतून भविष्यासाठी एक मोठी रक्कम जमविण्याचा प्रयत्न करतो. परंतु समस्या अशी आहे की, योग्य गुंतवणूक पर्याय त्यांना समजत नाही. अशा परिस्थितीत, SIP किंवा म्युच्युअल फंडचा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम आणि पैसे कमावणारा पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला 30 वर्षांत एक चांगला फंड तयार करायचा असेल, तर SIP मध्ये ₹4000, ₹5000, ₹6000, ₹7000, ₹8000, ₹9000 किंवा ₹10000 गुंतवून किती फंड तयार करता येईल ते जाणून घ्या.

जर तुम्ही नियमितपणे SIP मध्ये योग्य रक्कम गुंतवली तर तुम्ही कमी वेळातही एक चांगला फंड तयार करू शकता. समजा तुम्ही ₹4000, ₹5000, ₹6000, ₹7000, ₹8000, ₹9000 किंवा ₹10000 ची SIP सुरू केली आणि ते 30 वर्षांपर्यंत चालू ठेवलं, तर कंपाउंडिंगद्वारे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया रचू शकता.

SIP म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवता आणि जर तुम्ही बराच काळ गुंतवणूक करत राहिलात तर कंपाउंडिंगची जादू तुम्हाला दिसून येईल. म्हणजे तुम्हाला समजेल की जर तुम्ही 30 वर्षे SIP केली तर अंदाजे 12% वार्षिक परताव्याच्या आधारे किती फंड तयार करता येईल.

SIP मध्ये 4000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?

जर तुम्ही SIP मध्ये ₹4000 आणि ₹5000 गुंतवले तर तुम्ही 30 वर्षांत कोट्यधीश होऊ शकता, यामध्ये तुम्हाला अंदाजे 12 टक्के पर्यंत वार्षिक परतावा मिळेल. ₹4000 च्या SIP मध्ये गुंतवणूक रक्कम 
₹14,40000 (14.4 लाख) असेल. यामध्ये तुमचा नफा तब्बल 1.1 कोटी असेल आणि एकूण मॅच्युरिटी फंड ₹ 1.2 कोटी असेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp