महिलेचे सुरू होते भलत्याच पुरूषासोबत अनैतिक संबंध, पती आणि दिराला समजलं अन्...
Crime news: काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. याच हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना आता यश आलं आहे.
ADVERTISEMENT

गया (बिहार): बिहारमधील गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरातील 3 जून रोजी सापडलेल्या एका अज्ञात महिलेचा मृतदेहाची आता पोलिसांनी ओळख पटवली आहे. यानंतर गया पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक देखील केली आहे. या दोन्ही आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलं आहे. पण या घटनेबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं प्रकरण उघडकीस आलं तरी कसं?
वजीरगंजचे डीएसपी सुनील कुमार पांडे यांनी सांगितले की, अज्ञात महिलेचा मृतदेह मंझौली टेकडीच्या पायथ्याशी आढळला होता. महिलेचे इतर पुरुषासोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पती आणि दिराने तिची हत्या केली.
हे ही वाचा>> 'मी बेडमध्ये तुला मख्खन-मलई वाटते, आणि आता मात्र...', माजी क्रिकेटर मुनाफ पटेलचं नाव घेत बॉबी डार्लिंगने धुरळाच उडवला
वजीरगंजचे डीएसपी सुनील कुमार पांडे यांनी सांगितले की, या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार वजीरगंज डीएसपी आणि वजीरगंज पोलीस स्टेशनच्या नेतृत्वाखाली SIT टीम तयार करण्यात आली होती. ज्यानंतर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कारवाई सुरू करण्यात आली. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले की तिच्या पतीने आणि दिराने या अज्ञात महिलेची हत्या केली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, हे प्रकरण प्रेमसंबंधाचे आहे. ही महिला दुसऱ्या पुरुषावर प्रेम करत होती. तसंच ती एकदा त्याच्यासोबत पळून देखील गेली होती. याच प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल झाली होती. पण हीच गोष्ट तिच्या पतीला अजिबात आवडली नव्हती. त्यामुळेच त्याने आपल्या मामेभावासह कट रचून तिची हत्या केली.









