Uddhav Thackeray : हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करत राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह मराठी प्रेमींनी रान पेटवलं आहे. त्यातच दोन्ही ठाकरेंनी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 29 जूनला शासन निर्णयाची होळी करणार, 7 जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार असं म्हणत दीपक पवार यांनी या लढ्याची घोषणा केली. तर हुतात्मा स्मारक स्थळी अभिवादन करुन सुरूवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनीही यावेळी हिंदीची सक्ती चालणार नाही, जोपर्यंत हिंदी सक्ती मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅघ उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात
"बाटेंगे तो काटेंगे हे भाजपचं धोरण"
मुख्यमंत्री पाच मिनिटात जाहीर करू शकता की, मी राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही. पण बाटेंगे आणि काटेंगे हे भाजपं धोरण दिसतंय. मराठी-अमराठी लोकांमध्ये विषाचा खडा टाकताय. हिंदी भाषेला नाही, हिंदी सक्तीला विरोध आहे असं ठाकरेंनी सांगितलं.
"हिंदीचं वावडं नाही, पण सक्ती नको..."
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, हिंदीला विरोध असता, तर हिंदी सिनेमाला मुंबई, मराठींनी, महाराष्ट्राने जोपासलं नसतं. हिंदीचं वावडं नाही, हिंदी सक्ती नको.. .एक दिशा, एक विधान एक प्रधान... ही एकाधिकारशाहीकडे वाटचाल आहे. भाषिक आणीबाणीचा विरोध करणार, शिवसेनेतल्या गद्दारांना बाळासाहेबांचे विचार मराठीत सांगण्याची वेळ आलीये असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा >> मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅघ उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात
नको म्हणजे नको... सादरीकरण वगैरे नको... RSS चे भैय्या जोशी म्हणाले होते घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं म्हणतही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. आपला देश संघराज्य, आपली मांडणी भाषावार झालीये. भाजपमधील मराठी प्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. हिंदी सक्ती लादू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी जाहीर केली.
ADVERTISEMENT
