नवाब मलिक यांनी दिलेल्या ‘त्या’ पत्राची समीर वानखेडेंनी उडवली खिल्ली, म्हणाले…

दिव्येश सिंह

• 07:13 AM • 26 Oct 2021

नवाब मलिक यांनी आज निनावी पत्र समोर आणलं आहे. हे पत्र आपल्याला एनसीबीतल्याच एका अधिकाऱ्याने लिहिलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर लिहिलं आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याद्वारे त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्ज प्लांट करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. […]

Mumbaitak
follow google news

नवाब मलिक यांनी आज निनावी पत्र समोर आणलं आहे. हे पत्र आपल्याला एनसीबीतल्याच एका अधिकाऱ्याने लिहिलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर लिहिलं आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याद्वारे त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्ज प्लांट करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता या प्रकरणी समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे समीर वानखेडे यांनी?

नवाब मलिक यांनी समोर आणलेलं पत्र म्हणजे मोठा जोक आहे. त्यातले सगळे आरोप निराधार, बिनबुडाचे आणि निखालस खोटे आहेत. त्यामुळे याबाबत मी काय प्रतिक्रिया देणार? जे मी केलंच नाही जे अकारण मला बदनाम करण्यासाठी केलं जातं आहे त्याबाबत काय भाष्य करणार असं म्हणत समीर वानखेडे यांनी या पत्राची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवाद काँग्रसेचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचं आता समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

‘त्या’ पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.

मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. मागील दोन वर्षापासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. मागील वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग अँगलची चौकशी सोपविण्यात आली आणि माजी महासंचालक श्री. राकेश अस्थाना यांनी एसआयटीचं गठन करुन आपला चेला कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचं प्रभारी बनवून मुंबईमध्ये ड्रग अँगलची चौकशी सोपवली आणि सोबत समीर वानखेडे जे (DRI) मुंबईमध्ये काम करत होते त्यांना गृहमंत्री अमित शाह यांना सांगून नियमबाह्य पद्धतीने डीआरआयने लोन बेसिसवर एनसीबी मुंबईमध्ये झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केलं.

राकेश अस्थाना जे सर्वांनाच माहिती आहेत की, ते किती इमानदार अधिकारी आहेत, त्यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही मार्गाने बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग प्रकरणात अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश दिले.

केस दाखल केल्यानंतर केपीएस मल्होत्रा आणि समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली आणि कोट्यवधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांना देखील त्यातील काही हिस्सा दिला.

बॉलिवूडच्या या कलाकारांकडून (दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकार, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि अर्जुन रामपाल) सगळे पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करुन दिले.

अयाज खान यांची मैत्री समीर वानखेडेंशी आहे. ते एनसीबी कार्यालयात कधीही येऊ-जाऊ शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. ते समीर वानखेडेला बॉलिवूडकडून दर महिन्याला वसूली करुन देतो. तसंच जेव्हा समीर वानखेडे एखाद्या बॉलिवूड कलाकाराला पकडतो तेव्हा तो त्यांना अयाज खान याला आपला वकील म्हणून नेमण्यास सांगतो.

असे सगळे उल्लेख आणि आरोप या पत्रामध्ये आहेत. या पत्राची मात्र आता समीर वानखेडे यांनी खिल्ली उडवली आहे.

    follow whatsapp