‘भाजप मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष’ हे म्हणणाऱ्या सारंगी महाजन कुठल्या पक्षात जायला उत्सुक?

मुंबई तक

29 Sep 2021 (अपडेटेड: 29 Mar 2023, 09:32 PM)

प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर एक नाव चर्चेत आलं होतं ते नाव होतं त्यांच्या भावाचं म्हणजेच प्रवीण महाजन यांचं. प्रवीण महाजन यांनी रिव्हॉल्वरने प्रमोद महाजनांवर गोळ्या चालवल्या. त्यानंतर प्रवीण महाजन यांना तुरुंगवासही भोगावा लागला. प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत सारंगी महाजन त्यांच्या राजकारणात येण्याची चर्चा होते आहे कारण त्यांनी हिंदुस्थान पोस्ट या वेब पोर्टलला दिलेल्या […]

Mumbaitak
follow google news

प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर एक नाव चर्चेत आलं होतं ते नाव होतं त्यांच्या भावाचं म्हणजेच प्रवीण महाजन यांचं. प्रवीण महाजन यांनी रिव्हॉल्वरने प्रमोद महाजनांवर गोळ्या चालवल्या. त्यानंतर प्रवीण महाजन यांना तुरुंगवासही भोगावा लागला. प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत सारंगी महाजन त्यांच्या राजकारणात येण्याची चर्चा होते आहे कारण त्यांनी हिंदुस्थान पोस्ट या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्या भाजपमध्ये जातील का हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी भाजप हा मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष आहे असं उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

राजकारण म्हणजे काय तर समाजकरणच असतं. एका चांगल्या मोठ्या राष्ट्रीय राजकारणातल्या पक्षात मी जाणार आहे असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे. भाजप हा मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष आहे. त्या पक्षात मला घेतील असं वाटत नाही. मी दोन-तीन वेळा विचारून झालं आहे. मात्र मला वाटत नाही मला तिथे प्रवेश मिळेल. 2008 पासून मी हे म्हणते आहे की हा मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष आहे. त्यामुळे नात्यातले असो किंवा बाहेरचे असो कुणालाही यायचं असेल तर निर्णय यांचाच असतो असंही सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.

भाजपचा विचार बदलला तर चांगलंच आहे. मात्र तसं होईल असं वाटत नाही असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे. मी एकटी महिला आहे मी सारा फाऊंडेन नावाची संस्था सांभाळते आहे. लवकरच राजकारणात येईन असं त्यांनी म्हटलं आहे. माझ्याबाबत अनेकदा निगेटिव्हिटी पसरवली गेली होती. मात्र काय काय घडलं आहे त्यावर वेब सीरिजही काढणार आहे. मी माझं आत्मचरित्र लिहिलं आहे त्यावर ही वेब सीरिज आधारित असणार आहे असंही सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.

उस्मानाबादच्या जमिनीच्या वादात मला धमक्या दिल्या गेल्या होत्या. पाच वाटण्या करा त्यातली एक मागणी माझी आहे. आमची वडिलोपार्जित जागा होती. 2004 मध्ये प्रमोद महाजन यांनी तपस्वी ट्रस्टला दान केली असं दाखवलं आहे. मात्र 100 रूपयांच्या स्टँपपेपरवर दाखवलं जातं का? हा प्रश्न आहे. एकाही बहीण भावाची संमती नसताना तिथे संस्था उभ्या केल्या गेल्या. घरच्यांना याबाबत काहीही माहित नव्हतं. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर माझ्या दिरांना अध्यक्षपद हवं होतं ते त्या ट्रस्टने दिलं नाही. मात्र त्यावेळी काही चॅनल्सनी बातम्या चालवल्या होत्या. तो सगळा वाद सगळा समोर आला होता. त्याबाबत समझोता झाला, पण त्याप्रकरणी मला धोका देण्यात आला असाही आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. मी या अनुभवातूनही शिकले आहे.

मला त्रास देण्याच्या उद्देशातून अनेक गोष्ट घडली. माझे दीर एक प्यादं होतं, अख्ख्या उस्मानाबादमध्ये एका महिलेला त्रास देत आहेत त्यामुळे महाजनांची काय इमेज आहे ते कुणी जाऊन विचारू शकता. अजूनही ते भ्रमात जगत आहेत, त्यानी यातून बाहेर आलं पाहिजे. लोकांना काय वाटतं ते समजून घेतलं पाहिजे असंही सारंगी महाजन म्हणाल्या.

सारंगी महाजन कोण आहेत?

सारंगी महाजन या प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांवर गोळ्या चालवली. ठाण्याच्या तुरुंगात प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन शिक्षा भोगत होते त्यांचा 2015 मध्ये मृत्यू झाला.

    follow whatsapp