Today Shocking Viral News : पती-पत्नीचं नातं जीवनातील सर्वात पवित्र आणि सुंदर असतं. यामध्ये प्रेम, सन्मान, विश्वास आणि आपापसातील समजूत असते. पण कधी कधी या नात्यात वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे याचा थेट परिणाम नातेसंबंधावर होतो. पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पत्नीने सर्वात भयंकर कृत्य केलं.
ADVERTISEMENT
पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. ही धक्कादायक घटना झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात घडली. महिलेनं धारदार शस्त्राने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केल्यानं अनेकांना धक्काच बसला आहे.
संतापलेल्या पत्नीनं उचललं खतरनाक पाऊल
ही घटना लोहरदगा जिल्ह्यातील जुरिया गावात घडली. रविवारी पत्नी-पत्नीत वाद विवाद झाले. त्यामुळे पत्नीने या प्रकरणाला हिंसक वळण लावलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार उराव नावाच्या व्यक्तीनं त्याच्या पत्नीसोबत एका विषयावरून वाद घातला. वाद वाढल्यानंतर पतीने रागाच्या भरात पत्नीच्या थप्पड मारली.
हे ही वाचा >>मुंबईत पावसाचा धुमाकूळ, दुपारच्या शाळा, कॉलेजला सुट्टी; पाहा कुठे-कुठे साचलंय पाणी
त्यानंतर पत्नीने धारदार शस्त्राने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. स्थानिक लोकांच्या मदतीनं गंभीर जखमी झालेल्या पतीला लोहरदगा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाहीय. पतीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं समजते.
आधीही घडल्या आहेत अशाप्रकारच्या घटना
लोहरदगा जिल्ह्यातील या घटनेआधी झारखंडच्या पाकुड जिल्ह्यातील हिरणपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. येथील धरनीपहाड गावात कमली पहाडीन नावाच्या महिलेनं घरगुती वादविवादामुळे तिच्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला होता. तसच शरीराच्या इतर भागांवर वार करून तिने त्याची हत्या केली होती. याप्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली होती.
हे ही वाचा >> राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम
ADVERTISEMENT
