Mumbai Shocking Viral News : देशात बेकायदेशीरपणे राहण्याच्या आरोपाखाली 21 वर्षीय बांगलादेशी महिलेला नवी मुंबईहून अटक केली होती. महिला अनेक आजारांनी ग्रस्त होती. अशातच तिला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. पण ती रुग्णालयातून फरार झाली. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, पाच महिन्यांची गर्भवती महिला रुबीना इरशाद शेखने गुरुवारी एका कॉन्स्टेबलला धक्का दिला आणि ती रुग्णालयातून फरार झाली.
ADVERTISEMENT
पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, ती एक बांगलादेशी नागरिक आहे. या महिलेला 5 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ती भायखला येथील तुरुंगात होती. ती आजारी झाल्यानंतर तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रुबीना फरार झाल्याने तिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसच तिच्यावर आधीपासूनच पासपोर्ट आणि परदेशी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आरोपी महिलेला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष टीम गठित केल्याचं समजते.
हे ही वाचा >> "खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, खांद्यावर बंदूक ठेऊन...",मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नेमकं काय म्हणाले?
देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना योग्य प्रक्रिया केल्यानंतर निर्वासित केलं होतं. या 20 बांगलादेशी नागरिकांमध्ये 9 पुरुष आणि 11महिलांचा समावेश आहे. सर्व महिला देशात अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत आहेत.
त्या ठिकाणीही पकडले होते बांगलादेशी नागरिक
पालघर जिल्ह्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या 9 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये सात महिलांचाही समावेश होता. या प्रकरणाबाबत विरारचे पोलीस उपायुक्त (झोन-III) जयंत बजबळे म्हणाले होते, या बांगलादेशी नागरिकांना नालासोपाराच्या धानीवबाग भागातील गंगाडी पाडा येथून पकडण्यात आलं.
हे ही वाचा >> 'सैयारा'पेक्षा खतरनाक प्रेमी! गर्लफ्रेंडला उडवण्याचा रचला कट, होम थिएटरमध्ये बॉम्ब लपवून गिफ्ट घरी पाठवलं अन् नंतर घडलं..
ADVERTISEMENT
