पत्नीला दुसऱ्याच पुरुषाच्या शरीराचं आकर्षण! मग झाली मांत्रिकाची एन्ट्री अन् सगळा खेळच...

एका विवाहित महिलेला दुसऱ्याच पुरुषाची शरीरयष्टी आवडली आणि ती थेट त्या पुरुषाकडे निघून गेली. पत्नीच्या या कृत्यामागे एका मांत्रिकाचा हात असल्याचा पतीला संशय आला.

पत्नीला दुसऱ्याच पुरुषाच्या शरीराचं आकर्षण! मग झाली मांत्रिकाची एन्ट्री अन्...

पत्नीला दुसऱ्याच पुरुषाच्या शरीराचं आकर्षण! मग झाली मांत्रिकाची एन्ट्री अन्...

मुंबई तक

• 12:53 PM • 16 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी गेली दुसऱ्याच पुरुषासोबत पळून..

point

नवऱ्याला मांत्रिकावर संशय अन्..

Murder Case: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेला दुसऱ्याच पुरुषाची शरीरयष्टी आवडली आणि ती थेट त्या पुरुषाकडे निघून गेली. मात्र, पत्नीच्या या कृत्यामुळे तिच्या पतीला मोठा धक्का बसला. पत्नीच्या या कृत्यामागे एका मांत्रिकाचा हात असल्याचा पतीला संशय आला. त्यानंतर, त्याने त्या मांत्रिकाचा बदला घेण्यासाठी एक भयानक योजना आखली. परंतु, त्याच्या या प्लॅनमुळे पतीला तुरुंगाची खावी लागली.

हे वाचलं का?

मांत्रिकाची हत्या केल्याचं प्रकरण  

हे संपूर्ण प्रकरण बिसरख परिसरातील रोजा जलालपुर गावातील असल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या नरेश प्रजापती नावाच्या मांत्रिकाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी शुक्रवारी (15 ऑगस्ट) पाच आरोपींना अटक केली असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या मते, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ही हत्या करण्यात आली. पाच आरोपींपैकी मुख्य आरोपी म्हणजेच महिलेच्या पतीला मांत्रिकाच्या अलौकिक शक्तींमुळे पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्याचा संशय आला होता. याच कारणामुळे तीन महिन्यांपूर्वीस पतीने मांत्रिकाची हत्या करण्याची योजना आखण्यास सुरूवात केली होती.

मृतदेह कालव्यात फेकण्यात आला...  

घटनेत मृत पावलेली नरेश प्रजापती नावाची व्यक्ती 45 वर्षांची असून ती 2 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी संबंधित व्यक्तीचा मृतदेह बुलंदशहरमधील एका कालव्यात आढळला. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील तपास सुरू केला आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या मदतीने पोलिसांनी नीरज कुमार, सुनील कुमार, सौरभ कुमार, प्रवीण मावी आणि प्रवीण शर्मा या पाच आरोपींना अटक केली.

हे ही वाचा: भाजपा महिला नेत्याला लग्नाचं आमिश दाखवून शारीरिक छळ... मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख अन् जाळ्यात ओढलं...

मांत्रिकानेच पत्नीला पळून जाण्यास भाग पाडलं...   

मुख्य आरोपी प्रवीण शर्माची पत्नी 2022 मध्ये एका दुसऱ्याच पुरुषासोबत घर सोडून पळून गेल्याचं तपासात समोर आलं. आरोपी पतीच्या मते, नरेश प्रजापती या मांत्रिकाचं त्याच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं. त्या मांत्रिकानेच त्याच्या शक्तींचा वापर करुन पत्नीला प्रभावित केलं आणि तिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून जाण्यात भाग पाडलं. याच कारणामुळे पतीच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली. एसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीणने त्याच्या तीन मित्रांना या हत्येच्या प्रकरणात सहभागी होण्यासाठी शेकडो यार्ड जमीन आणि लक्झरी गाड्याचं आमिश दाखवलं होतं. या पाच साथीदारांपैकी एकाने त्याच्याच घरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली.

हे ही वाचा: 15 दिवसांनंतर लंडनला जाणार होती, पण अचानक 23 व्या मजल्यावरुन उडी मारली अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

पोलिसांनी केली आरोपींना अटक  

प्रकरणातील आरोपींना नरेश प्रजापतीला काही तांत्रिक विधी करण्याच्या बहाण्याने बोलावलं. 2 ऑगस्ट रोजी त्यांनी प्रजापतीला मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि गाडीतंच त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलं. मांत्रिक बेशुद्ध झाल्यानंतर त्याला बुलंदशहर येथे नेण्यात आलं आणि तिथे धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर बरेच वार करण्यात आले. हत्येनंतर त्याचा मृतदेह एका कालव्यात फेकण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

    follow whatsapp