सासऱ्याची लेकीसारख्या सुनेवर वाईट नजर, महिलेच्या कंबरेला चुकीचा स्पर्श... पीडितेनं घरात लावले सीसीटीव्ही

मुंबई तक

04 Mar 2026 (अपडेटेड: 04 Mar 2026, 07:28 PM)

crime news : एका विवाहितेनं आपल्या सासऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. सासऱ्यांनी कमरेला चुकीचा स्पर्श केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात एफआयआर दाखल करत प्रकरणाची माहिती मिळवली होती. या घटनेनं वडिलांसारखा सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना आहे. 

 crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सासऱ्याच्या भितीने सूनेनं घरात लावले सीसीटीव्ही

point

पीडितेशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न

Crime News : पंजाबमधील कपुरथरा शहारातील एका पोलीस ठाणे अंतर्गत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहितेनं आपल्या सासऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. सासऱ्यांनी कमरेला चुकीचा स्पर्श केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात एफआयआर दाखल करत प्रकरणाची माहिती मिळवली होती. या घटनेनं वडिलांसारखा सासरा आणि लेकीसारख्या सुनेच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस

सासऱ्याच्या भितीने सूनेनं घरात लावले सीसीटीव्ही

वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेनं तक्रारीत सांगितलं की, पतीसोबत ती सासरवाडीत एकटीच राहते. पीडितेचा आरोप आहे की, सासरे मुकेश तिच्यावर वाईट नजर ठेवतात, ज्यामुळे तिने आपल्या घरात सीसीटीव्ही लावून ठेवले होते. पीडितेनं सांगितलं की, तिच्या खोलीला लागूनच तिच्या सासऱ्याची खोली आहे.

पीडितेशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न

जेव्हा ती लॉबीमध्ये जाते तेव्हा तिचा सासरा तिथे येतो आणि तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करतो, तसेच अनेकदा विनयभंग देखील करतो. तिचा आरोप आहे की, सासरा मुकेशने तिच्या पाठीवर थाप मारली आणि तिला चुकीचा स्पर्श केला. 

हे ही वाचा : आरोपीने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड, नवऱ्यासह मुलांना सोडून महिला गेली पळून... नंतर झाला पश्चात्ताप

संबंधित प्रकरणात अधिकारी बलजित सिंह यांनी सांगितलं की, पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे दशमेल कॉलनीतील रहिवासी आरोपी सासरा मुकेशविरुद्ध एफआरआय दाखल केला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती.