सरकारी कर्मचाऱ्याने बायकोचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर केले व्हायरल, त्याखाली रेटही लिहिला; धक्कादायक प्रकरण

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर पत्नीचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल केला. याखाली त्याने रेटही लिहिला. यामुळे महिलेला मोठ्या प्रमाणात बदनामी सहन करावी लागत आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:14 PM • 04 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर केले व्हायरल

point

त्याखाली रेटही लिहिला

point

सरकारी कर्मचाऱ्याचे कृत्य

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर पत्नीचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल केला. याखाली त्याने रेटही लिहिला. यामुळे महिलेला मोठ्या प्रमाणात बदनामी सहन करावी लागत आहे. याप्रकरणी तिने आपल्या नराधम नवऱ्याविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकारी कार्यालयात धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे. आरोपी भारतीय रेल्वेत सरकारी सेवेत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ब्राह्मण मुलीसोबत तुमच्यातलाच असल्याचं सांगून संबंध ठेवले, गरोदर झाल्याने लग्नाचा तगादा लावताच धर्मांतरासाठी दबाव

शरीराला चिमट्याने डागले

या पीडित महिलेचा विवाह तीन वर्षांपूर्वी एका रेल्वे कर्मचाऱ्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती, सासू आणि नणंद यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. पीडितेने आपल्या तक्रारीत एका अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा उल्लेख केला आहे. सुमारे एक वर्षांपूर्वी तिच्या पतीने तिला आठवडाभर खोलीत ओलीस ठेवले होते आणि गरम चिमट्याने तिचे शरीर डागले होते. नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर ती पुन्हा सासरी गेली, मात्र छळ थांबला नाही. त्यामुळे शेवटी ती आपल्या माहेरी परतली.

अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

माहेरी गेल्यानंतरही या नराधम पतीने तिचा छळ थांबवला नाही. त्याने पत्नीचा सूड घेण्याच्या उद्देशाने तिची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे ठरवले. त्याने पीडितेचे काही खासगी आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. इतकेच नाही तर, त्या फोटोंसोबत अश्लील टिप्पण्या लिहून आणि रेट नमूद करून तिचा मोबाईल नंबर सार्वजनिक केला. यामुळे पीडित महिलेला अनोळखी क्रमांकावरून सतत अश्लील फोन आणि मेसेज येत असून, यामुळे ती आणि तिचे कुटुंब प्रचंड मानसिक धक्क्यात आहे.

हे ही वाचा : शिक्षकाच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती, गव्हाच्या पिकाआड 27 हजार रोपे

दोषीवर कडक कारवाईचे आश्वासन

या गंभीर प्रकरणाची दखल घेत मेरठच्या एसएसपींनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आयटी ॲक्ट आणि छळाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 'एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसोबत केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून, दोषीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,' असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
 

    follow whatsapp