Crime News: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधाचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने 18 महिन्यांच्या निष्पाप मुलीची हत्या करण्याचा कट रचला. आरोपी महिला तिच्या पतीच्या कथित प्रेयसीला इतकी वैतागली होती की तिने पतीच्या प्रेयसीच्या निष्पाप मुलीची हत्या करून तिचा मृतदेह 10 दिवस घरात लपवून ठेवल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
18 महिन्यांच्या मुलीला टार्गेट केलं
संबंधित घटना ही बागदरा चौकी परिसरातील निवारी गावात घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या माहितीनुसार, पतीला रात्री उशिरा होणाऱ्या फोन कॉल्स आणि पती बराच वेळ फोनवर बोलत असण्याने महिलेला तिच्या पतीवर अनैतिक संबंधांचा संशय आला. यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेने तिच्या कथित प्रेयसीच्या 18 महिन्यांच्या मुलीला टार्गेट केलं.
मृतदेह गुंडाळून 10 दिवस घरात ठेवला...
वृत्तानुसार, दीड वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या महिलेने तिच्या पतीच्या कथित प्रेयसीचा बदला घेण्यासाठी हत्येचा कट रचल्याचं सांगण्यात येत आहे. तिने आधी तिच्या पतीच्या प्रेयसीच्या मुलीचं अपहरण केलं, तिला घरी आणले आणि बाळाचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, महिलेने बाळाचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून सुमारे 10 दिवस घरात लपवून ठेवला. मात्र, मृतदेहाला वास येऊ लागल्याने तिने तो शेतात फेकून दिला.
हे ही वाचा: मुंबईची खबर : मुंबई-गोवा हायवेचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार... सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पोलिसांची माहिती
पोलिसांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, गावकऱ्यांना एका शेतात निष्पाप मुलीचा मृतदेह आढळला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर, पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला महिलेने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, टेक्निकल तपास आणि कठोर चौकशीत तिचं सत्य उघडकीस आलं.
आरोपी महिलेने पोलिसांसमोर कबूल केलं की तिने मुलीचा गळा दाबून खून केला होता. तिने सांगितलं की तिला तिच्या पतीचा मृत मुलीच्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे तिने आधी मुलाचं अपहरण केलं आणि नंतर तिच्या आईचा बदला घेण्यासाठी त्याची हत्या केली. तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
ADVERTISEMENT











