Crime News: विवाहबाह्य संबंधातून बऱ्याच धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातील बरेलीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेने तिच्या पतीला धोका देऊन दुसऱ्याच पुरुषासोबत संबंध बनवले. इतकेच नव्हे, तर पतीला सोडून ती तिच्या सासरी निघून गेली. मात्र, ज्या प्रियकरासाठी महिलेनं सगळं सोडलं, त्याच प्रियकराने शेवटी तिला धोका दिला. काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पतीला सोडून माहेरी राहू लागली...
महिलेनं तिच्या प्रियकारासाठी नवऱ्याला देखील सोडलं. मात्र, अखेर तिला तिच्या प्रियकराकडून धोका मिळाल्यानंतर तिने तिच्या प्रियकरावर तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचा आरोप केला आणि गुरुवारी नवाबगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. संबंधित तरुणीचं तीन वर्षांपूर्वी एका तरुणासोबत लग्न झालं असून तिचे दुसऱ्याच पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. यामुळेच पतीला सोडून ती माहेरी राहू लागली.
हे ही वाचा: पत्नीला दुसऱ्याच पुरुषाच्या शरीराचं आकर्षण! मग झाली मांत्रिकाची एन्ट्री अन् सगळा खेळच...
संबंधित तरुणीने केलेल्या आरोपानुसार, तिचा प्रियकर तिला लग्नाची खोटी आश्वासनं देऊन तिच्यासोबत शारीरिक अत्याचार करत राहिला आणि तो तिच्यासोबत लग्नाला नकार देत आहे. यामुळेच संतापलेल्या तरुणीने प्रियकराच्या घरी जाऊन त्याच्यासोबत लग्नाचा हट्टा धरला. मात्र, त्यावेळी आरोपी तरुणाच्या नातेवाईकांनी पीडितेला मारहाण करत घरातून हाकलून दिलं. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू असून आरोपींवर कारवाई केली जाईल.
लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक अत्याचार
तरुणीने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की तिच्या प्रियकराने तिला लग्नाची खोटी आश्वासनं दिली आणि यालाच बळी पडून पीडिता पतीला सोडून तिच्या माहेरी राहू लागली. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोपी देखील पीडितेने तिच्या प्रियकरावर केला आहे. नवाबगंज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं तिच्या प्रियकराच्या विरोधात गंभीर आरोप केले असून संबंधित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी छापा देखील टाकला मात्र, आरोपी फरार असल्याचं आढळून आलं. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
हे ही वाचा: Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास
हे प्रकरण संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. तरुणीने प्रियकरावर विश्वास ठेवून चुकीचं पाऊल उचललं मात्र, त्यामुळे तिचा मोठा विश्वासघात झाल्याचं स्थानिकांनी म्हटलं.
ADVERTISEMENT
