नवरा परदेशात अन् इकडे सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; नवरा म्हणाला, गप्प रहा, कुटुंबाची इज्जत महत्त्वाची! नेमकं काय घडलं?

Crime News : एका 28 वर्षीय विवाहितेवर तिच्या 58 वर्षीय सासऱ्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका अनिवासी भारतीयाची (NRI) पत्नी असून, तिचा नवरा परदेशात एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर पती कामासाठी परदेशात असल्याने पीडिता सासू-साऱ्यांसोबत राहत होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

05 Mar 2026 (अपडेटेड: 05 Mar 2026, 11:15 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा परदेशात अन् इकडे सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार

point

नवरा म्हणाला, गप्प रहा, इज्जत महत्त्वाची!

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका 28 वर्षीय विवाहितेवर तिच्या 58 वर्षीय सासऱ्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका अनिवासी भारतीयाची (NRI) पत्नी असून, तिचा नवरा परदेशात एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर पती कामासाठी परदेशात असल्याने पीडिता सासू-साऱ्यांसोबत राहत होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : धुळवडीच्या दिवशी विवाहित प्रियकराला भेटायला गेली अन् सोबत आलेल्या भावांनीच तरुणाचा केला गेम...

जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार

तक्रारीनुसार, ही घटना सप्टेंबर 2023 मध्ये विवाह झाल्यानंतर काही महिन्यांनी घडली. पीडितेचा पती घरी आला असताना एका रात्री तो आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी पीडिता आपल्या खोलीत एकटीच झोपली होती. मध्यरात्री 1 च्या सुमारास सासऱ्याने तिच्या खोलीत प्रवेश केला. पीडितेची झोप उघडल्यानंतर तिने प्रतिकार करण्याचा आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधम साऱ्याने तिचे तोंड दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार करून तिथून पळ काढला.

कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी गप्प बसवले

दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने या अत्याचाराची माहिती आपली सासू आणि पतीला दिली. मात्र, न्याय मिळवून देण्याऐवजी दोघांनीही कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी तिला गप्प राहण्यास सांगितले. पतीने तिला धीर देत लवकरच स्वतःसोबत परदेशात नेण्याचे आश्वासन दिले. मात्र, या काळातही आरोपी सासरा तिच्यावर पुन्हा वाईट नजर ठेवून होता, ज्यामुळे पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होती. सासरच्या मंडळींच्या दबावामुळे सुरुवातीला तिने पोलिसांत तक्रार केली नाही.

हे ही वाचा : मुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार, ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू; व्हिडिओ

नवऱ्याने संपर्कच तोडला

काही दिवसांनी नवऱ्याने परदेशात घेऊन जाण्याचे खोटे आश्वासन देऊन पीडितेला तिच्या माहेरी सोडले आणि परत येऊन घेऊन जाईन असे सांगितले. मात्र, बराच काळ उलटूनही नवरा तिला न्यायला आला नाही आणि त्याने संपर्कही तोडला. नंतर तो तिला न सांगताच परदेशात निघून गेल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने माहेरच्यांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले. सध्या पोलिसांनी 58 वर्षीय सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 

    follow whatsapp