धुळवडीच्या दिवशी विवाहित प्रियकराला भेटायला गेली अन् सोबत आलेल्या भावांनीच तरुणाचा केला गेम...

धुलिवंदनाच्या दिवशी आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून ही भयानक घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

धुळवडीच्या दिवशी प्रियकराचा केला गेम

धुळवडीच्या दिवशी प्रियकराचा केला गेम

मुंबई तक

• 10:45 AM • 05 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

धुळवडीच्या दिवशी विवाहित प्रियकराला भेटायला गेली अन्...

point

सोबत आलेल्या भावांनीच तरुणाचा गेम केला...

Crime News: धुलिवंदनाच्या दिवशी आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना दिल्लीतील नोएडा येथील सेक्टर-75 मध्ये घडल्याची माहिती आहे. प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून ही भयानक घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. येथील आयव्ही काउंटी सोसायटीमध्ये होळीचं सेलिब्रेशन सुरू असताना तरुणाची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

दोन भावांसोबत प्रियकराला भेटायला गेली अन्... 

39 वर्षीय साहिल सिंघल अशी मृत तरुणाची ओळख समोर आली आहे. पोलिसांच्या  माहितीनुसार, पीडित साहिल आधीच विवाहित होता आणि मागील चार वर्षांपासून त्याचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध सुरू होते. होळीच्या दिवशी, तीच महिला आपल्या दोन भावांसोबत साहिलला भेटण्यासाठी आली होती. दरम्यान, त्यांचं एकमेकांसोबत बोलणं सुरू असताना साहिल आणि संबंधित महिलेच्या भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की संतापाच्या भरात महिलेच्या एका भावाने साहिलवर गोळी झाडली. साहिलला गोळी लागताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा: भारतातून इराणला परतत असलेली युद्धनौका श्रीलंकेत पोहोचताच अमेरिकेचा हल्ला, 87 जणांचा मृत्यू

पोलिसांचा तपास 

या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या साहिलला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली तसेच मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: मुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार, ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू; व्हिडिओ

या प्रकरणासंबंधी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, प्रेमसंबंधाच्या वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून सर्व बाजूंचा विचार करून प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. 

    follow whatsapp