Shirdi Crime : शिर्डीतील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी मिळून सोनूकुमार ठाकूर नावाच्या तरुणावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 16 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत वृद्ध महिलेसोबत मोठा स्कॅम, ऑनलाईन दुध मागवलं अन् 'इतक्या' लाखांना घातला गंडा, नेमकं काय घडलं?
हल्लेखोरांची नावे आली समोर
संबंधित प्रकरणात हल्ला करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत. एकाचं नाव साई कुमावत आणि दुसऱ्याचे नाव शुभम गायकवाड असे आहे. दोघेही शिर्डीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. काही तासानंतर शिर्डी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मृत सोनूकुमार आणि आरोपींच्यात पूर्वीपासून वाद सुरू होते. त्याच वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोनूकुमार ठाकूरचे वडील नवीनकुमार ठाकूर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच तक्रारीवरून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 (1), 115 (2), 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. हत्येचं नेमकं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा : बुध ग्रह 'या' तारखेला राशी बदलणार, काही राशीतील लोकांना पैशांचा कधीच तुटवडा पडणार नाही
शिर्डीत भीतीचं वातावरण
या घटनेनं शिर्डीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. दरम्यान, काही वर्षांपासून शिर्डीत गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. याच गुन्हेगारीला आळा कसा घालता येईल हे फार महत्त्वाचे आहे.
ADVERTISEMENT
