घरात घुसून आईवर बंदूक रोखली, 12 वीच्या मुलीवर गोळीबार करत संपवल, आरोपीने व्हिडिओ रेकॉर्ड करत...

मुंबई तक

03 Mar 2026 (अपडेटेड: 03 Mar 2026, 01:23 PM)

crime news : तरुणाने एका 12 वीच्या मुलीच्या घरात घुसून गोळीबार करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने तिच्या आईवरही गोळीबार केला, पण ती सुदैवानी वाचली. गुन्हा केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी जखमी असलेल्या विद्यार्थिनीला बनहारा परिसरातील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनदीपने विद्यार्थिनीला प्रेमप्रकरणात अडकवले अन् व्हिडिओ शेअर केले

point

आरोपीने पीडितेच्या आईवर बंदुक रोखली

Crime News : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने 12 वीच्या मुलीच्या घरात घुसून गोळीबार करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने तिच्या आईवरही गोळीबार केला, पण ती सुदैवानी वाचली. गुन्हा केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी जखमी असलेल्या विद्यार्थिनीला बनहारा परिसरातील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, संबंधित प्रकरणातील आरोपीचे नाव मनदीप असे आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'त्या' 2 रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी, प्रकाश आंबेडकरांच्या ट्वीटने खळबळ

मनदीपने विद्यार्थिनीला प्रेमप्रकरणात अडकवले अन् व्हिडिओ शेअर केले

वृत्तानुसार, आरोपी मनदीपने विद्यार्थिनीला प्रेमप्रकरणात अडकवले आणि नंतर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले. संबंधित प्रकरणात कुटुंबाच्या तक्रारीनुसार, कलवारी पोलीस ठाण्यात आयटी कायद्याच्या कलमांन्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात दोन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवागरात पाठवला, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

आरोपीने पीडितेच्या आईवर बंदुक रोखली

जेव्ही अनुष्का आणि तिचा भाऊ अविनाश बाहेर झोपले होते, तेव्हा आईने गोळीबार केल्याचा आवाज ऐकताच ती जागी झाली. त्याचक्षणी त्या आरोपी मनदीपने तिच्यावर बंदूक रोखली. त्याने मच्छरदानी काढून तिच्यावर निशाणा देखील साधला. मध्यरात्रीच्या या गोळीबाराममुळे परिसर हादरून गेला. कलवारी पोलीस ठाणे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह दोन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

हे ही वाचा : अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, इराणचे जोरदार प्रत्युत्तर; सौदी अरेबियातील अमेरिकेन दूतावासदेखील जळाले

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि कुटुंबाकडून संपूर्ण माहिती घेण्यात आली होती. संबंधित प्रकरणाच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई करण्यात आली. फरार आरोपी मनदीपला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध शुरु केला आहे.