Crime News : नवरा मारहाण करत असताना एका महिलेने आपल्या भावाला फोन केला. बहिणीची आर्त हाक ऐकून तो भाऊ आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी गेला. मात्र मेहुण्याने कात्रीने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. विशाल (23) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्रातील 'त्या' खुनाचा अडीच वर्षांनंतर उलगडा; बॉडी जंगलात पुरली, DNA चाचणीवरुन तपास, दोघांना अटक
'लवकर ये आणि मला वाचव'
मृत विशालची बहीण टीना हिचा सोमवारी संध्याकाळी तिच्या पतीसोबत वाद झाला होता. टीनाने घाबरून आपल्या भावाला फोन केला आणि 'लवकर ये आणि मला वाचव' अशी विनवणी केली. बहिणीचे भीतीदायक बोलणे ऐकताच विशाल तातडीने तिच्या घरी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर विशाल आणि त्याचा मेहुणा राहुल ऊर्फ अर्जुन सिंह यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
कात्रीने भोसकले
या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात राहुलने घरातून कात्री आणून विशालवर सपासप वार केले. विशालच्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पोलिसांपासून प्रकरण लपवण्यासाठी आरोपी आणि नातेवाईक विशालचा मृतदेह एका टेम्पोमध्ये घालून परस्पर अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले होते.
हे ही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात
गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी सांगितले की, बेहटा हाजीपूर पुलाजवळ पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून टेम्पो अडवला. पोलिसांना पाहताच आरोपी तिथून पसार झाले. डॉक्टरांनी पोलिसांच्या माहितीशिवाय मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता, तरीही कुटुंबीय गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही, मात्र पोलीस फरार आरोपी राहुलचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











