महाराष्ट्रातील 'त्या' खुनाचा अडीच वर्षांनंतर उलगडा; बॉडी जंगलात पुरली, DNA चाचणीवरुन तपास, दोघांना अटक

मुंबई तक

04 Mar 2026 (अपडेटेड: 04 Mar 2026, 09:22 AM)

Gadchiroli Crime : आंबेखारी येथील महेश शामसाय कळ्यामी (वय 23) हा नोव्हेंबर 2024 मध्ये बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी जंगल परिसरात पुरलेला सांगाडा आढळला. तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पंचनामा करून डीएनए तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले. दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी आलेल्या डीएनए अहवालात सांगाडा हा महेश कळ्यामी याचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाची दिशा बदलली.

Gadchiroli Crime

Gadchiroli Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील 'त्या' खुनाचा अडीच वर्षांनंतर उलगडा

point

बॉडी जंगलात पुरली, DNA चाचणीवरुन तपास, दोघांना अटक

Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात अडीच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर हा खून कोणी केला? याचा अखेर उलगडा झाला आहे. जमीन वाटपाच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामदास अमरू कळ्यामी (वय 59 वर्ष), दसरु ठाकुरराम कल्लो (42) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कोरची ठाण्यात भा.न्या.संहिता कलम 103(1), 238(ब), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

आंबेखारी येथील महेश शामसाय कळ्यामी (वय 23) हा नोव्हेंबर 2024 मध्ये बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी जंगल परिसरात पुरलेला सांगाडा आढळला. तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पंचनामा करून डीएनए तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले. दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी आलेल्या डीएनए अहवालात सांगाडा हा महेश कळ्यामी याचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाची दिशा बदलली.

हेही वाचा : गडचिरोली : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून अभियंत्याचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात

जमीन वादातून खून 

तपासात उघड झाले की, जमीन वाटपावरून महेशचा त्याचे काका रामदास कळ्यामी यांच्याशी वाद सुरू होता. जुलै 2024 मध्ये झालेल्या तीव्र वादानंतर रामदास कळ्यामी आणि दसरू ठाकूरराम कल्लो यांनी महेशचा जंगलात पाठलाग करून कुऱ्हाडीने हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात पुरण्यात आला.
           
सदर कारवाई कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख एएसआय दलपत मडावी पोलीस हवलदार लक्ष्मण नैताम, हस्तकला दर्रो, पोलीस शिपाई इन्साराम ताराम, धोंडणे यांनी केली आहे.

तपासी अधिकारी प्रतिक्रिया 

“डीएनए अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे", असं पोलीस अधिकारी शैलेन्द्र ठाकरे यांनी सांगितलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

प्रेयसी म्हणाली, 'तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, 10 लाख रुपये दे..' पुरुषानं विष पिऊन उचललं टोकाचं पाऊल