65 वर्षीय वृद्ध बायकोने 70 वर्षीय पतीवर डिझेल टाकून जाळलं, नंतर बाहेरून लॉक लावून काढला पळ

Crime News : नवरा-बायकोच्या विवादाने एक हिंसक रुप घेतले. एका 65 वर्षीय वृद्ध बायकोने आपल्या 70 वर्षीय पती रामपतवर डिझेल टाकून त्याला जाळून टाकलं. यानंतर खोलीला टाळा लावून महिला फरार झाली. संबंधित घटनेची माहिती सकाळी समजली असता, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपी वृद्ध व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेत चौकशी करण्यासाठी एकत्र आली.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:47 PM • 03 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं वृद्धावर डिझेल ओतून जाळून टाकलं

point

नंतर घटनास्थळावरून काढला पळ

Crime News : नवरा-बायकोच्या विवादाने एक हिंसक रुप घेतले. एका 65 वर्षीय वृद्ध बायकोने आपल्या 70 वर्षीय पती रामपतवर डिझेल टाकून त्याला जाळून टाकलं. यानंतर खोलीला टाळा लावून महिला फरार झाली. संबंधित घटनेची माहिती सकाळी समजली असता, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपी वृद्ध व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेत चौकशी करण्यासाठी एकत्र आली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : घरात घुसून आईवर बंदूक रोखली, 12 वीच्या मुलीवर गोळीबार करत संपवल, आरोपीने व्हिडिओ व्हायरल केला

नेमकं काय घडलं? 

श्यामदेऊरवा ठाणे क्षेत्रातील बासपार कोठी टोला पिपरा गावातील निवासी सुमित्रा 10 वर्षांपूर्वी रोजगारासाठी मुंबईत गेली होती. त्याचदरम्यान तिची भेट मुंबईतील रामपतसोबत झाली होती. त्यांच्यात जवळीकता वाढल्यानंतर सुमित्रा त्याला घेऊन आपल्या पिपरा या गावात घेऊन गेली होती.

महिलेनं वृद्धावर डिझेल ओतून जाळून टाकलं

नुकताच त्यांच्यात मोठा वाद झाला, त्यानंतर ते दोघे एकाच घरात आपलं वेगवेगळं जेवण बनवू लागले होते. सोमवारी त्यांच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, तिने वृद्धावर डिझेल ओतून जाळलं.

हे ही वाचा : पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन

महिलेनं बाहेरून टाळा लावत घटास्थळावरून पळ काढला

तेव्हा पीडित वृद्ध व्यक्ती उठून पळू लागला असता, महिलेनं बाहेरून टाळा लावला आणि घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रकरण उघडकीस आला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास केला, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp