रुममध्ये एकट्या भाचीला पाहून नराधम मामाची नियत फिरली..केलं मोठं कांड! मुलाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली अन् नंतर..

Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या औरेयामध्ये एक संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नराधम मामाने त्याच्या 17 वर्षांच्या भाचीसोबत घाणेरडं कृत्य केलं.

Bihar Minor Girl Rape Case

Minor Girl Rape Case

मुंबई तक

• 04:29 PM • 16 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ननिहालमध्ये थांबली होती पीडित मुलगी

point

पोलिसांनी आरोपी मामाला केली अटक

point

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या औरेयामध्ये एक संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नराधम मामाने त्याच्या 17 वर्षांच्या भाचीसोबत घाणेरडं कृत्य केलं. पीडित मुलगी मैनपुरी जिल्ह्यातील ओछा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते. पण रक्षाबंधन उत्सवात आरोपी मामा बहीण आणि भाचीला घेऊन ननिहालमध्ये आला होता. ही धक्कादायक घटना 15 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.

हे वाचलं का?

65 वर्षीय आरोपी भुरे सिंगने घरात एका रुममध्ये भाचीसोबत अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला 6 मामा आहेत. तिच्यासोबत तिसऱ्या नंबरच्या मामाने रेप केला. पीडित मुलीच्या दुसऱ्या मामाच्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या काकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

ननिहालमध्ये थांबली होती पीडित मुलगी

जेव्हा पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी पोहोचले, तेव्हा तो शेतात काम करत होता. आरोपी रक्षाबंधनाआधी कार घेऊन त्याच्या बहिणीच्या घरी गेला होता. तिथून तो त्याची बहीण आणि भाचीला गावात घेऊन गेला होता. दोन दिवसानंतर बहीण सासरी गेली आणि भाची ननिहालमध्ये थांबली होती. याचदरम्यान, तिच्या तिसऱ्या नंबरच्या मामाने तिच्यावर अत्याचार केला.

हे ही वाचा >> Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास

पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू

पोलीस अधिकारी बिधूना पुनीत मिश्रा यांनी माहिती देत म्हटलं, 15 ऑगस्टला औरेया येथील कुदरकोट पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की, एका अल्पवयीन मुलीसोबत मामाने चुकीचं कृत्य केलं आहे. त्यानंतर कुदरकोट पोलिसांच्या टीमने याप्रकरणाचा तपास केला असता ही घटना सत्य असल्याचं समोर आलं. आरोपी विरोधात पीडितेच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला होता. ज्या आधारे पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

हे ही वाचा >> Mumbai Rain: आज दहीहंडीच्या दिवशीच पाऊस घालणार मुंबईत धुमाकूळ! ‘या’ भागात साचणार पाणी

    follow whatsapp