Delhi Crime : देशाची राजधानी दिल्लीत मन सुन्न करुन टाकणारी घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या 65 वर्षांच्या आईवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. एफआरआय दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, आरोपीचं वय हे 39 आहे. महिलेनं पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, माझं दुसरीकडे कुठे लफडं असल्याचा माझ्या मुलाला संशय आहे. त्यानंतर मुलानेच पीडित आईवर दोन वेळा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एल्विश यादवच्या घरावर तब्बल 'एवढे' राउंड गोळीबार, घरी कोण कोण होते? घटनेचा थरार
लेकानेच आईला ठरवलं चारित्र्यहिन नंतर...
घडलेल्या घटनेनुसार, सेंट्रल दिल्लीस्थीत असलेल्या हौज काजी परिसरात मुलाने आपल्या आईवर चारित्र्यहिन असल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर त्याच मुलाने आपल्या आईवर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनीच संबंधित प्रकरणाची माहिती दिली होती. पोलिसांनुसार, एका तक्रारदाराने सांगितलं की, महिला आपल्या 25 वर्षीय मुलीसोबत हौज काजी पोलीस ठाण्यात गेले.
आरोपीवर गुन्हा दाखल
पीडितेच्या मुलाने केलेले धक्कादायक कृत्य, मारहाण आणि तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतीय न्यासंहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : शिर्डी हादरली! मध्यरात्री दोघांनी तरुणाला घेरलं, नंतर धारदार शस्त्राने सपासप वार केले, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेबाबत सांगितलं की, 25 जुलै रोजी ते आपल्या 72 वर्षीय पतीसोबत आणि लेकीसोबत सौदी अरेबियाच्या यात्रेला गेल्या होत्या. यात्रेदरम्यान, पीडित आईच्या मुलावर चारित्र्यहिन असल्याचा आरोप करण्यात आला.
तक्रारीनुसार, पीडित आई ही निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी पतीसोबत आणि तिच्या मुलीसोबत राहते. आरोपी मुलगाही त्यांच्यासोबतच राहतो. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
