Crime News: पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर आपला अपराध लक्षात येताच त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी पतीचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील हरसूद पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दमदमा गावात ही भयानक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने तिचा मृतदेह नाल्याजवळ फेकला आणि त्यानंतर त्याने 15 किमी दूर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली. चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. फूलवती (36) अशी पीडित महिलेची ओळख समोर आली असून तिचा पती रामप्रसाद याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. घटनेच्या दिवशी, आरोपी रामप्रसादने दारूच्या नशेत पीडितेला मारहाण केली आणि याच मारहाणीदरम्यान तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपी पती अतिशय घाबरला आणि त्याने तिचा मृतदेह नाल्याच्या कडेला फेकून तिथून पळ काढला.
हे ही वाचा: 12 वीत शिकणाऱ्या तरुणीचे प्रायव्हेट फोटो व्हायरल केले; शेवटी, झोपलेल्या अवस्थेत डोक्यात गोळी घालून तिला संपवलं!
पोलिसांचा तपास
रेल्वे ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनस्थळी पोहोचले आणि तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना एका तुटलेला मोबाईल फोन सुद्धा सापडला. तपासात समोर आलं की फुलवतीची हत्या केल्यानंतर रामप्रसादला पश्चात्ताप झाला आणि त्यानंतर, 15 किलोमीटर अंतरावर त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत फुलवती आणि आरोपी रामप्रसाद यांना दोन मुले होती, खरं तर, फुलवती 15 दिवसांपूर्वीच घर सोडून गेली होती, त्यामुळे रामप्रसाद प्रचंड रागावला होता. त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. ती परत आल्यावर त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि त्यातूनच ही भयंकर घटना घडली.
ADVERTISEMENT











