एकीकडे होलिका दहन अन् दुसरीकडे बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार; हत्या करुन मुलगा बिर्याणी खाऊन का झोपला?

मुंबई तक

• 01:57 PM • 04 Mar 2026

Crime News : एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या करुन त्याने आपल्या वडिलांचा मृतदेह घराजवळील पाण्याच्या टाकीत नेऊन टाकला. यानंतर बाहेर जाऊन बिर्याणी खाऊन आला आणि शांतपणे चादर ओढून झोपी गेला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एकीकडे होलिका दहन अन् दुसरीकडे बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार

point

हत्या करुन मुलगा बिर्याणी खाऊन का झोपला?

Crime News : होळीच्या रात्री एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या करुन त्याने आपल्या वडिलांचा मृतदेह घराजवळील पाण्याच्या टाकीत नेऊन टाकला. यानंतर बाहेर जाऊन बिर्याणी खाऊन आला आणि शांतपणे चादर ओढून झोपी गेला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या अंबिकापूर परिसरात होळीच्या सणादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा प्रभात केरकेट्टा उर्फ लेदा याला ताब्यात घेतले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'आत चल, मी तुला चांगला ऊस देतो..' ऊसाच्या शेतात नेऊन 11 वर्षाच्या पुतणीवर बलात्कार, चुलत्याचं संतापजनक कृत्य

दारु पिण्यावरुन वाद

मृत पारस केरकेट्टा (वय 50) हे छत्तीसगडमधील बहेरापारा येथील आपल्या स्वतंत्र घरात राहत होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांचा मुलगा प्रभात हा वास्तव्यास होता. सोमवारी रात्री 11 च्या सुमारास प्रभात दारुच्या नशेत घरी पोहोचला. मुलाची ही अवस्था पाहून वडील पारस यांनी त्याला कडक शब्दात सुनावले आणि दारु पिण्यावरून त्याची कानउघडणी केली. वडिलांनी रागावल्याचा राग मनात धरुन प्रभातने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

कुऱ्हाडीने डोक्यात सपासप वार

हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात प्रभातने घरातील कुऱ्हाड काढली आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावर एकामागून एक सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर इजा झाल्यामुळे पारस यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा जीव गेल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मृतदेह घराशेजारील एका छोट्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला. या निर्घृण कृत्यानंतर कोणताही पश्चात्ताप न होता आरोपीने बाहेर जाऊन बिर्याणी खाल्ली आणि घरी येऊन शांतपणे चादर ओढून झोपी गेला.

हे ही वाचा : 'लवकर ये आणि मला वाचव..' बहिणीचा भावाला फोन, भाऊ मदतीला गेला अन् दाजीने कात्रीने भोसकून केली हत्या

हत्येची कबुली

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी प्रभातला ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीत त्याने रागाच्या भरात वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, किरकोळ वादातून पोटच्या मुलाने पित्याचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.