Maharashtra Crime : राज्यातील अहिल्यानगरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या चार लहान मुलांसोबत स्वत:ही आत्महत्या केली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पतीने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण समोर आलं आहे. पत्नी नाराज होऊन आपल्या माहेरी गेली होती. पुन्हा ती आलीच नाही, याच त्रासातून पतीने आपल्या मुलांसह आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं आहे.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित प्रकरणातील मृत पतीचे नाव अरुण काळे असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम
त्या चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि..
घडलेल्या घटनेनुसार, अरुण काळे हे आहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहेत.अरुणचं आणि त्याच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर पत्नीनं आपलं माहेर गाठलं, तिनं पुन्हा येणार नसल्याचं सांगितलं. अरुणने तिला अनेकदा घरी बोलावले पण ती घरी परतलीच नाही. तेव्हा त्या चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि स्वत:ही आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, अरुण काळे यांचा मृतदेह हा विहिरीत आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा एक हात आणि पाय हा दोरीने बांधलेला होता.
हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाचा हाहाकार, रत्नागिरी- सिंधुदुर्गात वरूणराजाचं रौद्ररुप अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट
मृतांची नावे आली समोर
दरम्यान, शिवानी (8 वर्षे), प्रेम (7 वर्षे), वीर (6 वर्षे) आणि कबीर (5 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनं अहिल्यानगर हादरून गेले आहे. शुल्लक कौटुंबिक कलहामुळे सारं कुटुंब नाहीसं झालं यावर लोकांना कसलाही विश्वास बसत नाही. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
