वर्ध्यातल्या भीषण अपघातात सात विद्यार्थी ठार, भाजप आमदार विजय रहांगदळे यांच्या मुलाचाही मृत्यू

मुंबई तक

• 02:50 AM • 25 Jan 2022

सुरेंद्र रामटेके, वर्धा, प्रतिनिधी वर्ध्यात झालेल्या भीषण अपघातात या अपघात भाजप आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा अविष्कारसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. […]

Mumbaitak
follow google news

सुरेंद्र रामटेके, वर्धा, प्रतिनिधी

हे वाचलं का?

वर्ध्यात झालेल्या भीषण अपघातात या अपघात भाजप आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा अविष्कारसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांच्या मुलासह एकूण सात विद्यार्थी या भीषण अपघातात दगावले असून इतर सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. भीषण कार अपघातातानं सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वर्ध्यात एका SUV कारचं नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेडिकलला शिकणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. देवळी या ठिकाणाहून वर्धा या ठिकाणी येत असताना सेलसुरा या ठिकाणी हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. सुमारे 40 फूट पुलावरून ही कार कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

राज्यातील भीषण अपघातांची मालिका सुरु असून रविवारी रात्रीपासून राज्यानं भीषण अपघात पाहिलेत. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. अवघ्या चोविस तासांत महाराष्ट्रात रस्ते अपघात आठ बळी गेले होते. अशातच सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे. वर्ध्यातील कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आता गेल्या 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृ्त्यू झाला आहे.

    follow whatsapp