बाप रे बाप ! Bombay High Court मध्ये शिरला साप, सर्वांची पळापळ

विद्या

• 09:52 AM • 21 Jan 2022

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सध्या हायकोर्टातील सुनावण्या या व्हर्च्युअल पद्धतीने होत आहे. यामुळे सध्या हायकोर्टात वकील व इतर पक्षकारांची वर्दळ कमी असते. असं असलं तरीही शुक्रवारी एक पाहुणा हायकोर्टात आला. या पाहुण्यामुळे हायकोर्टात उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. बॉम्बे हायकोर्टात जस्टीस एन.आर.बोरकर यांच्या चेंबरमध्ये एक भलामोठा साप आढळून आला. हा साप जवळपास ४ ते ५ […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सध्या हायकोर्टातील सुनावण्या या व्हर्च्युअल पद्धतीने होत आहे. यामुळे सध्या हायकोर्टात वकील व इतर पक्षकारांची वर्दळ कमी असते. असं असलं तरीही शुक्रवारी एक पाहुणा हायकोर्टात आला. या पाहुण्यामुळे हायकोर्टात उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

हे वाचलं का?

बॉम्बे हायकोर्टात जस्टीस एन.आर.बोरकर यांच्या चेंबरमध्ये एक भलामोठा साप आढळून आला. हा साप जवळपास ४ ते ५ फूट लांब आणि बिनविषारी होता. हायकोर्टाच्या जुन्या हेरिटेज बिल्डींगमधील चेंबरमद्ये जस्टीस बोरकर हजर नसताना सकाळच्या वेळेत हा साप आढळून आला.

हायकोर्टाच्या स्टाफ मेंबरला हा साप दिल्यानंतर त्याने तात्काळ उपस्थित पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही एका सर्पमित्राला पाचारण करत या सापाला सुखरुप बाहेर काढलं. सर्पमित्राने या सापाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. या सापाला पाहण्यासाठी यावेळी लोकांची चांगलीच जमा झाली होती. सध्या कोविडमुळे व्हर्च्युअल सुनावणी सुरु असल्यामुळे हायकोर्टात वर्दळ कमी असते. मागच्या आठवड्यात हायकोर्टामध्ये एका माकडानेही हजेरी लावली होती.

    follow whatsapp