महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच ते तीन तास चाललेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. ही बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे कुणाला तरी खुश करण्यासाठी आहेत असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार
“महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. अँटेलिया प्रकरणाचा तपास एनआयएकडून तर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल असा आम्हाला विश्वास आहे”
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलीस दलाचे निलंबीत अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक करण्यात आली. स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने या केसमध्ये अनेक पुरावे शोधून काढले. ज्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकलं. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. परंतू पदावरुन हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
या आरोपानंतर भाजपने सातत्याने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं आता जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास हा NIA कडे आहे. ते दोषींना शोधून काढतील आणि त्यांना आम्ही योग्य ती शिक्षा दिली जाईल असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
परमबीर सिंग यांनी काय म्हटलं होतं पत्रात?
“मार्च महिन्याच्या मध्यावधीत मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला अँटिलीया बाहेरील तपासाची माहिती देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी मी या तपासात माननीय गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती दिली. याबद्दल मी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही माहिती दिली. काही मंत्र्यांना माझ्या ब्रिफींगमधले मुद्दे आधीच माहिती असल्याचं माझ्या लक्षात आलं.” या पत्रात पुढे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडून १०० कोटींची मागणी केल्याचाही उल्लेख केला आहे.
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख राजीनामा देणार का??
आज दुपारी शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
अनिल देशमुख यांच्यावर झालेला १०० कोटींच्या वसुलीचा आरोप गंभीर आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. सचिन वाझे यांची नियुक्ती ही परमबीर सिंग यांनीच केली होती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे की निर्णय घेण्याचे सर्वस्वी सगळे अधिकारी आहेत. या संबंधी आम्ही चर्चा केल्यावरच आम्ही निर्णय घेऊ असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरीही शरद पवार हे सांगायला विसरले नाहीत की जे काही आरोप झाले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही.
ADVERTISEMENT











