वसई: 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या जवानाचा संशयास्पदरित्या मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

मुंबई तक

• 11:46 AM • 07 Dec 2021

वसई: भारतीय लष्करात असलेल्या एका 26 वर्षीय जवानाचा मृतदेह संशयास्पदरित्या रेल्वे रुळावर आढळून आला आहे. मीरारोड ते दहिसरदरम्यान हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाचं नाव भूपेंद्र सिंह टोकस असं आहे. जो गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होता. भूपेंद्र सिंह टोकस हे मुंबईमधून चार दिवसांपूर्वीच अचानक गायब झाले होते. ज्याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रारही […]

Mumbaitak
follow google news

वसई: भारतीय लष्करात असलेल्या एका 26 वर्षीय जवानाचा मृतदेह संशयास्पदरित्या रेल्वे रुळावर आढळून आला आहे. मीरारोड ते दहिसरदरम्यान हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाचं नाव भूपेंद्र सिंह टोकस असं आहे. जो गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होता.

हे वाचलं का?

भूपेंद्र सिंह टोकस हे मुंबईमधून चार दिवसांपूर्वीच अचानक गायब झाले होते. ज्याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली होती. दरम्यान, आता रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा तपास आता वसई लोहमार्ग पोलीस करत आहेत.

वांद्रे-गाझीपूर एक्सप्रेसच्या धडकेत भूपेंद्र सिंह टोकस यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भूपेंद्र सिंह टोकस हे लष्करात लुधियाना युनिट इथे कार्यरत होते. सेवा अंतर्गत कोर्स करण्याकरिता ते मुंबईत आले होते. ज्यानंतर ही गंभीर घटन घडली.

तब्बल 4 दिवस बेपत्ता असलेल्या भूपेंद्र सिंह टोकस यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडणं हे संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचे आहे की, वसई लोहमार्ग पोलीस व कफ परेड पोलीस कशाप्रकारे भूपेंद्र सिंह टोकस यांच्या मृत्यूचा छडा लावतात.

पाहा पोलिसांनी नेमकी काय दिली माहिती

‘मीरारोड ते दहिसर या दरम्यान एका ट्रेनची धडक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. दरम्यान, घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आम्ही वसई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, सदर मृत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या बॅगेत आयकार्ड आणि मोबाइल आढळला असून सदर इसमाची ओळख पटली आहे.’

‘त्यानुसार हा व्यक्ती भारतीय लष्करात लुधियाना येथे नोकरीस होता. तो नेव्ही नगर कुलाबा येथील युनिटमध्ये सेवातंर्गत कोर्स करण्याकरिता आलेला होता.’

दुर्दैवी ! खड्ड्यांत गाडी आदळल्यामुळे गोळी छातीत घुसली, सशस्त्र सीमा बलाच्या जवानाचा मृत्यू

’30 नोव्हेंबरपासून भूपेंद्र हा नेव्ही नगरमधील युनिटमधून निघून गेला होता. याबाबत कफ परेड पोलीस स्थानकात तो हरवल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाची आम्ही सर्व बाजूने चौकशी करत आहोत. सध्या प्राथमिकदृष्ट्या हा अपघाती मृत्यू वाटत असला तरीही आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहोत.’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.

    follow whatsapp