राज्य महिला आयोग एकच महिना माझ्या ताब्यात द्या असं का म्हणाल्या तृप्ती देसाई?

मुंबई तक

18 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:55 AM)

फक्त एक महिन्यासाठी महिला आयोगाचं अध्यक्षपद माझ्याकडे द्या कायदा काय असतो मी दाखवून देते असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्या व्यवस्थित काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तृप्ती देसाईंचा शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पाठिंबा का? काय […]

Mumbaitak
follow google news

फक्त एक महिन्यासाठी महिला आयोगाचं अध्यक्षपद माझ्याकडे द्या कायदा काय असतो मी दाखवून देते असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्या व्यवस्थित काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

तृप्ती देसाईंचा शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पाठिंबा का?

काय म्हणाल्या आहेत तृप्ती देसाई?

“राज्य महिला आयोगाचं नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग असं केलं पाहिजे. पुढच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाने हा ठराव पास करावा. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम कार्यक्रमांचं उद्घघाटन करणं आणि फित कापत बसणं एवढंच नाही. त्या निर्णय घेऊ शकतात. मात्र रूपाली चाकणकर या तसं काहीही करताना दिसत नाहीत. पक्षातल्या कुणावर काही गुन्हा दाखल झाला की कारवाई करायची. मात्र विरोधी पक्षातलं काही असेल तर फारसं लक्ष द्यायचं नाही असं काम होत नसतं. शरद पवारांना मी विनंती करेन की फक्त एक महिना माझ्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या कायदा काय असतो? सगळ्या गोष्टींमध्ये समानता कशी आणायची? स्त्रियांना त्यांचा हक्क कसा मिळवून द्यायचा हे मी दाखवून देईन.”

पुण्यात बालगंधर्व सभागृहात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. तत्यावेळी स्मृती इराणी यांचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवा केली होती. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ज्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतरच तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट करून रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

तृप्ती देसाई यांनी केतकी चितळे प्रकरणातही तिला पाठिंबा दिला होता. कुणालाही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. केतकी चितळेने जी पोस्ट शेअर केली त्यात शरद पवार हे नाव कुठेच नाही, त्यामुळे असं म्हणता येणार नाही की तिने शरद पवारांविषयीच पोस्ट लिहिली आहे. दुसरी बाब म्हणजे केतकी चितळेला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तिच्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरत आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवालही तृप्ती देसाईंनी विचारला होता.

    follow whatsapp