Crime News : वडील आणि मुलीच्या नात्यासारखं कोणतंच असं नातं नाही. पण याच वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडीकस आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीत एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहे. माझ्या पतीची आपल्या अल्पवयीन मुलीवर घाणेरडी नजर असल्याचा गंभीर आरोप केला. तिचा बाप आपल्याच मुलीचा विनयभंग करतो. एवढंच नाही, तर त्याने घरातून लाखो रूपये घेतले आणि तो फरार झाल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे तिथे काय उणे, बाईकवरून तरुणी आणि तरुणाचा उघडपणे रोमान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नेमकं काय घडलं?
महिलेनं पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिचा पती दागिने घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडितेच्या आईचा नवऱ्यावर गंभीर आरोप
ते प्रकरण कॅन्ट पोलीस ठाणे परिसरातील एका कॉलनीत घडलं. एका महिलेनं पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणाने त्याच्यावरील असलेले जुने गुन्हे समोर आले आहेत. तो काही वर्षांपूर्वी तुरुंगात होता, त्यानंतर तो तुरूंगातून सुटल्यानंतर तो घरी परतला. बापाची लेकीवर वाईट नजर असल्याचा पीडितेच्या आईने आरोप केला. आपल्या 14 वर्षीय मुलीची नराधम बाप छेड काढतो. तो एवढ्यावरच न थांबता त्याच्या मुलीला त्याच्यासमोरच कपडे काढण्यास सांगतो, अशी माहिती पीडितेनं दिली आहे.
हेही वाचा : भयंकर! शिक्षिका विद्यार्थ्याला करायची व्हिडिओ कॉल, नंतर न्यूड होऊन करायची उत्तेजित
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, पत्नीने पतीच्या कृत्याला विरोध केल्यानंतर त्याने दोघांना बेदम मारहाण केली. एवढंच नाही, तर पत्नीचं म्हणणं आहे की, पती घरात ठेवलेले दागिने, रोख रक्कम आणि स्कूटर घेऊन पळाला. पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हेगारावर कारवाई करून त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाईल, असे पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
