बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेला हादराच बसला! सीटजवळ बसलेल्या प्रवाशाने पँट काढून हस्तमैथुन सुरु केलं अन्..

Today Shocking Viral News :  केरळच्या कोल्लम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलीय. एका महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून आरोपीवर कारवाई करण्यात आलीय.

Woman Molested In A Bus

Woman Molested In A Bus

मुंबई तक

30 Jul 2025 (अपडेटेड: 30 Jul 2025, 03:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं पोलिसांना व्हिडीओ दाखवून तक्रार दाखल केली

point

आरोपीला पोलिसांनी केली अटक

point

बसमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Woman Molested In Bus :  केरळच्या कोल्लम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलीय. एका महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून आरोपीवर कारवाई करण्यात आलीय. महिलेनं आरोप केला होता की, बसमध्ये प्रवास करत असताना एक व्यक्ती तिच्या सीटजवळ बसला होता. त्यानंतर त्याने कपडे काढून हस्तमैथुन केलं. आरोपीच्या या विकृत कृत्याचा महिलेनं व्हिडीओ बनवला आणि पोलिसांना दाखवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आणि त्याला अटक केली. सुनील कुमार (43) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो कोल्लम येथील म्यलक्कडचा रहिवासी आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, महिला मावेलिक्कारा फास्ट पॅसेंजर केएसआरटीसी बसमध्ये कोट्टियमहून कोल्लमला जात होती. महिलेनं तक्रार दाखल करत म्हटलंय की, त्यावेळी बसमध्ये खूप गर्दी होती. आरोपी महिलेच्या जवळच्या सीटवर येऊन बसला आणि महिलेसमोर अश्लील चाळे करू लागला. महिलेनं त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करणं सुरु केलं. महिलेनं सांगितलं की, तिने व्हिडीओ पोलिसांना दाखवण्याची आरोपीला धमकीही दिली होती. पण त्यानंतरही त्याने हस्तमैथून सुरुच ठेवलं.

हे ही वाचा >>इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात

महिलेनं पोलिसांना व्हिडीओ दाखवून तक्रार दाखल केली

महिलेनं कोल्लम ईस्ट पोलीस स्टेशनमध्ये आरोपीचा व्हिडीओ दाखवून तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. एक लुकआऊट नोटिस जारी करून तपास सुरु केला आणि आरोपीला अटक केली. बसमध्ये आणखी तीन महिला सुद्धा होत्या. त्यांनाही वाटत होतं की, आरोपी विरोधात कडक कारवाई व्हावी, असंही महिलेनं म्हटलं आहे.

आरोपीला पोलिसांनी केली अटक

कोल्लम सिटी पोलिसांनी आरोपी सुनील कुमारला इथिक्कारा पुलाजवळ अटक केली. सोमवारी पीडित महिलेनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. प्रवासादरम्यान महिलांसोबत अश्लील कृत्य घडल्याच्या अनेक घटना याआधीही समोर आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांना काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना सामोरं जावं लागतं, असं या घटनेच्या माध्यमातून समोर आलं आहे.

हे ही वाचा >> ग्राहकांनो! ज्वेलर्स शॉपमध्ये जाऊन उड्याच मारा..सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण! वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    follow whatsapp