crime news : आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही हुंडाबळीला कंटाळून अनेक स्त्रियांनी आपलं जीवन संपवलं आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण नुकतंच ताजे आहे. त्यानंतर म्हाडाच्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीनंही याच हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हुंड्याच्या त्रासाला कंटाळून महिला तरुणीने आत्महत्या केली. तिचा पती दुसरा तिसरा कोणीही नसून उत्तर प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल आहे. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शूट करून शेअर केला आहे. त्यात ती पीडित महिला म्हणाली की, तिच्या पतीला मी महत्त्वाची नाहीये, त्यांना मला नांदवायचं नाहीय, असा गंभीर आरोप केला. ही घटना लखनऊच्या बीकेटी पोलीस ठाणे पसरिसरात घडली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आई नव्हे ही तर कसाई, आपल्याच बॉयफ्रेंडला लेकीच्या खोलीत पाठवलं अन् बाहेरून लावली कडी, नराधमाने व्हिडिओ शूट केले...
नेमकं प्रकरण काय ?
हुंड्याच्या त्रासाला कंटाळून महिला तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या महिला तरुणीचं नाव सौम्य कश्यप असे आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओत सौम्याने तिच्या सासरच्यांनी दुसऱ्या लग्नासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. तिचा पती अनुरागने तिला मारहाण केल्याचा आणि तिच्या मेहुण्याने तिला धमकावल्याचा आरोप केला आहे. सौम्या आणि अनुरागचा चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.
संबंधित प्रकरणात सौम्याने आपल्या पतीवर धक्कादायक आरोप केले आहेत. सौम्या कश्यप व्हिडिओत रडताना दिसत आहे. रडताना तिने वकिलाच्या सांगण्यावरून माझी हत्या करण्यात येणार असल्याचा पतीवर आरोप केला आहे. कारण वकील दुसरा तिसरा कोणीही नसून पतीचा काकाच आहे. पोलीस अधिकारी जितेंद्र दुबे यांनी कॉन्स्टेबलच्या पीडित पत्नीने आत्महत्या केल्याची पुष्टी केली आहे. प्रभारी निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि कुटुंबातील अनेक सदस्यांना माहितीही दिली. या प्रकरणात फॉरेन्सिक लॅबही तपासणीस आले, असे अधिकाऱ्याने सांगितलं.
हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणासह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात बरसणार जोरदार
व्हिडिओ शेअर करत मनातील सल केली व्यक्त
सौम्याने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत मनातली सल व्यक्ती केली आहे. ती म्हणाली की, लग्नानंतर तिला तिच्या सासरच्या मंडळींना भरपूर त्रास दिला आहे. याच जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल होऊन सौम्याचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर सौम्याच्या पालकांना चांगलीच माहिती देण्यात आली होती. तिचे पालक मैनपुरीमध्ये आणि तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिचे कुटुंब मैनपुरीहून लखनऊ येथे रवाना झाले.
ADVERTISEMENT
