crime news : एका अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबाला घटनेची माहिती मिळताच, परिस्थिती अचानकपणे तणावपूर्ण झाल्याचं चित्र निर्माण झालं. राग हा अंतिमक्षणी एका हिंसाचारापर्यंत पोहोचला. या धक्कादायक प्रकरणात एका महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रनौड पोलीस स्टेशन परिसरात घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरमध्ये पोलिसांच्या भीतीपोटी तरुण धावू लागले, मालगाडीने दिली धडक अन् तिघांचा करुण अंत
तरुणाने अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा कुटुंबीयांचा संताप
घटनास्थळी एका तरुणाने अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत थेट आरोपीचं घर गाठलं होतं. आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर त्याच्याकडून जाब विचारण्यास सुरुवात केली होती. दोघांमधील वाद वाढत गेला आणि काही वेळातच लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्याने गावात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र होतं, यादरम्यान घटनास्थळी लोक गोळा झाले होते.
भांडणात मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आईला संपवलं
या भांडणात आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्ती केली असता, या हाणामारीत आईचा मृत्यू झाला. संबंधित माहिती गावात पसरली असता, गावात शोक व्यक्त केला जात आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तरुणांविरुद्ध अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा : आईने पाच महिन्यांच्या बाळावर फरशीने हल्ला करत डोकं फोडलं, नंतर मृतदेह स्वयंपाकघरात पुरला
संबंधित प्रकरणात आईच्या मृत्यूप्रकरणी पीडितेच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT











