Crime News: उत्तर प्रदेशातील संतकबीर नगरमधून एका संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर 4 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामधील तीन आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही घटना खलीलाबाद कोतवाली परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
पीडितेच्या आईने केली तक्रार
सोमवारी (28 जुलै) सायंकाळी एका महिलेने खलीलाबाद कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले की तिची 10 वर्षांची अल्पवयीन मुलगी रविवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास तिच्या नेहमीच्या कामासाठी तलावाकडे गेली होती. त्याच वेळी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आलं. त्या मुलीला गावातील चार लोकांनी वाटेत घेरलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता.
हे ही वाचा: गुप्तांगातून रक्त अन् गळ्यात बांधलेला गमछा, 5 वर्षांच्या मुलीसोबतच केलं घृणास्पद कृत्य अन् नंतर...
बलात्काराचा व्हिडीओ देखील शूट...
पीडितेसोबत असं घृणास्पद कृत्य करताना नराधमांनी व्हिडीओ सुद्धा बनवला. मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला सोडलं आणि त्यानंतर पीडिता घरी पोहचली. त्यावेळी आपली रडत रडत घरी परतली असल्याचं पीडितेच्या आईने सांगितलं. तसेच ते चारही आरोपी तलावाजवळ बसून शूट केलेला व्हिडिओ पाहू लागले. मुलीने घरी येऊन तिची तिच्यासोबत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल सांगितलं. महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून आरोपींना अटक
घटनेची माहिती देताना चार आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, पोक्सो अॅक्ट आणि एससीएसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, यामधील तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती दिली. चार आरोपी तरुणांपैकी पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर दोन आरोपी घर सोडून फरार झाल्याची पोलिसांनी माहिती दिली.
हे ही वाचा: आई नव्हे ही तर कसाई, आपल्याच बॉयफ्रेंडला लेकीच्या खोलीत पाठवलं अन् बाहेरून लावली कडी, नराधमाने व्हिडिओ शूट केले...
पोलीस प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असून लवकरच ते आरोपींना पकडण्यात यशस्वी होतील, असं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT
